विमानतळावर ४६ लाखांचे सोने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:57 AM2018-04-10T00:57:27+5:302018-04-10T00:57:27+5:30
लोहगाव विमानतळावरून अवैधरीत्या सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन प्रवाशांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून तब्बल ४६ लाख रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले. सोमवारी ही कारवाई करण्यात आली.
पुणे : लोहगाव विमानतळावरून अवैधरीत्या सोन्याची तस्करी करणाऱ्या दोन प्रवाशांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून तब्बल ४६ लाख रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले. सोमवारी ही कारवाई करण्यात आली.
शेख हसिना नासीर (रा. डोंगरी, मुंबई) आणि अब्दुनिकासार कासारागौड कुन्ही (केरळ) अशी ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. विमानतळावर वैयक्तिक तपासणी करत असताना नासीर हिच्याकडे लोखंड व सोने एकत्रित असलेल्या पावडरची ३ पॅकेट आढळून आली. ज्यामध्ये पोलिसांनी सुमारे १४०६ ग्रॅम सोने जप्त केले. जप्त केलेले सोने २३.२८ कॅरेटचे असल्याचे समजते. या सोन्याचे बाजारभावानुसार मूल्य तब्बल ४२ लाख ७१ हजार २५७ रुयांचे आहे. तर बदाऊन या प्रवाशाकडून सामान तपासताना ११६ ग्रॅम सोने चॉकलेटच्या कव्हरमध्ये आढळून आले. या सोन्याची किंमत ३ लाख ६३ हजार ८० रुपये एवढी आहे. या दोन्ही प्रवाशांकडून सोने जप्त केले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.