नीरा येथील ४८ गणेश मंडळे मिळून बसवणार एकच गणपती; पोलीस प्रशासन व नागरिकांच्या बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:15 AM2021-09-04T04:15:46+5:302021-09-04T04:15:46+5:30

जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी या निर्णयाबद्दल सर्व गणेश मंडळांचे कौतुक केले, तर असा चांगला उपक्रम ...

48 Ganesha Mandals at Nira to be set up by a single Ganapati; Decision in the meeting of police administration and citizens | नीरा येथील ४८ गणेश मंडळे मिळून बसवणार एकच गणपती; पोलीस प्रशासन व नागरिकांच्या बैठकीत निर्णय

नीरा येथील ४८ गणेश मंडळे मिळून बसवणार एकच गणपती; पोलीस प्रशासन व नागरिकांच्या बैठकीत निर्णय

Next

जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी या निर्णयाबद्दल सर्व गणेश मंडळांचे कौतुक केले, तर असा चांगला उपक्रम राबवणाऱ्या परिसरातील सर्व गणेश मंडळांना पोलीस अधीक्षकांकडून सन्मान पत्र देऊ असेही त्यांनी आश्वासन दिले.

नीरा दूरक्षेत्राच्या आवारात गुरवार दोन सप्टेंबर रोजी सायंकाळी नीरा परिसरातील विविध गावातील गणेश मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ, सरपंच गावातील पदाधिकारी व पोलीस पाटील यांची संयुक्त बैठक पार पडली. यावेळी जेऊर, पिंपरे (खुर्द), गुळूंचे, कर्नलवाडी थोपटेवाडी ग्रामस्थांनी एक गाव एक गणपतीचा प्रस्ताव मंडळ नीरेचे माजी उपसरपंच दीपक काकडे यांनी यावेळी आपण सर्व मंडळात मिळून एकच गणेशमूर्ती आणावे असा प्रस्ताव मांडला. याला नीरा ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी पाठिंबा दिला. त्याला उपसरपंच राजेश काकडे यांनी दुजोरा दिला. त्यामुळे नीरा शहरात ४८ मंडळात मिळून पोलीस स्टेशनच्या आवारात एकच गणपती बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक पुरंदर पंचायतीचे माजी उपसभापती गोरखनाथ माने, नीरेचे उपसरपंच राजेश काकडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नाना जोशी, सहायक पोलीस उपनिरीक्षक कैलाष गोतपागर, धनंजय काकडे, पिंपरेचे सरपंच उत्तमराव थोपटे, नीरेचे पोलीस पाटील राजेंद्र भास्कर, जेऊरचे पोलीस पाटील कुंडलिक तांबे, गुळूंचेचे पोलीस पाटील दीपक जाधव, कर्नलवाडीचे पोलीस पाटील दिनेश खोमणे, नीरा ग्रामपंचायतीचे सदस्य व विविध गावचे गणेश मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

---

फोटो क्रमांक : ०३ नीरा गणेश मंडळ

फोटोओळ : नीरा (ता. पुरंदर) पोलीस दूरक्षेत्रात परिसरातील गावातील गणेश मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ व पोलीस पाटील यांच्या संयुक्त बैठक मार्गदर्शन करताना नाना जोशी.

Web Title: 48 Ganesha Mandals at Nira to be set up by a single Ganapati; Decision in the meeting of police administration and citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.