४९ हजार विद्यार्थ्यांनी भरले अर्ज

By admin | Published: June 3, 2017 03:00 AM2017-06-03T03:00:25+5:302017-06-03T03:00:25+5:30

इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेत शुक्रवारपर्यंत सुमारे ४९ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्जाचा पहिला भाग भरला आहे. त्यापैकी सुमारे

49 thousand students completed the application | ४९ हजार विद्यार्थ्यांनी भरले अर्ज

४९ हजार विद्यार्थ्यांनी भरले अर्ज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रियेत शुक्रवारपर्यंत सुमारे ४९ हजार विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्जाचा पहिला भाग भरला आहे. त्यापैकी सुमारे ७ हजार ७०० विद्यार्थ्यांनी पहिला भाग पूर्ण भरून तो निश्चित केल्याची माहिती केंद्रीय प्रवेश समितीकडून देण्यात आली.
पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये अकरावीची प्रवेश प्रक्रिया समितीमार्फत आॅनलाईन पद्धतीने राबविली जात आहे. आॅनलाइन अर्जाचा पहिला भाग भरण्याची सुरुवात दि. २५ मे पासून झाली आहे. सर्व शाळास्तरावरच आॅनलाइन अर्ज भरून घेतले जात आहे. पहिला भाग निश्चित करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर टाकण्यात आली आहे.
७ हजार ७२० विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित केले आहेत. दहावीचा निकाल पुढील आठवड्यात लागण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांकडून अर्ज भरण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.

Web Title: 49 thousand students completed the application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.