दरोडा टाकल्याप्रकरणी हिनादीदीसह ५ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:10 AM2021-03-05T04:10:12+5:302021-03-05T04:10:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : खडकी बाजार येथील एका घरात शिरुन हत्याराचा धाक दाखवून दरोडा टाकल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी हिनादिदीसह ...

5 arrested for robbery | दरोडा टाकल्याप्रकरणी हिनादीदीसह ५ जणांना अटक

दरोडा टाकल्याप्रकरणी हिनादीदीसह ५ जणांना अटक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : खडकी बाजार येथील एका घरात शिरुन हत्याराचा धाक दाखवून दरोडा टाकल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी हिनादिदीसह ५ जणांना अटक केली आहे.

रिना ऊर्फ हिना तायडे (वय २४), रोहन किरण बिवाज (वय १९), विशाल ऊर्फ टेंग्या विनोद कांबळे (वय १९), आकाश ऊर्फ आक्कु संजय वाघमारे (वय २२, सर्व रा. महादेववाडी, खडकी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी मैनुद्दीन कुरेशी (वय ३८, रा. जुना खडकी बाजार) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार एकूण १२ जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना जुना खडकी बाजारात २ मार्च रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली होती.

आरोपी व फिर्यादी हे एकमेकांच्या परिचयाचे आहेत. मागील काही दिवसांपासून चांदणे व कुरेशी या दोन गटांत वाद सुरू आहेत. दोन महिन्यांपूर्वी हिनादीदी व तिच्यासोबत असलेल्या तरुणावर गुन्हा दाखल झाला होता. मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास हीना ही तिच्या साथीदारांसह फिर्यादीच्या परिसरात गेली होती. त्या वेळी त्यांच्यात वादावादी झाली. त्यातून आरोपींनी कुरेशीच्या घरात घुसून त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना हत्याराचा धाक दाखवत कपाटाच्या तिजोरीतील ८ हजारांची रोकड व आईच्या कानातील सोन्याचे टॉप्स जबरदस्तीने काढून नेले. तसेच हातातील हत्यारे हवेत फिरवत परिसरात दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करून खडकी पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

खडकी परिसरात चांदणे व कुरेशी गटात नेहमी वादावादी होत असून खडकी पोलिसांनी या दोन्ही गटावर कारवाई करुन त्यांच्यातील जवळपास ९० सराईतांना कारागृहात डांबले आहे. तरीही त्यांच्यातील हाणामारी कमी होताना दिसत नाही.

Web Title: 5 arrested for robbery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.