दरोड्याच्या तयारीतील ५ गुन्हेगार जेरबंद; लोणीकंदजवळ वाहनचालकांना लुटण्याच्या होते प्रयत्नात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 01:42 PM2021-08-12T13:42:40+5:302021-08-12T13:42:48+5:30

सर्वांवर यापूर्वी जबरी चोरी, शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत.

5 criminals arrested in preparation for robbery; Attempts were made to rob motorists near Lonikanda | दरोड्याच्या तयारीतील ५ गुन्हेगार जेरबंद; लोणीकंदजवळ वाहनचालकांना लुटण्याच्या होते प्रयत्नात

दरोड्याच्या तयारीतील ५ गुन्हेगार जेरबंद; लोणीकंदजवळ वाहनचालकांना लुटण्याच्या होते प्रयत्नात

Next
ठळक मुद्देपोलिसांनी केली त्यांच्याकडील घातक शस्त्रे जप्त

पुणे : लोणीकंद परिसरात रात्री येणार्‍या जाणार्‍या वाहनांना अडवून त्यांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या सराईत ५ गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने जेरबंद केले.

राजन गोपाल नायर (वय ३१), राहुल गोटीराम साळुंखे (वय ३३, दोघे , रा. उत्तमनगर), आकाश तायप्पा कानडे (वय २१, रा. वडारवस्ती, येरवडा), अक्षय मधुकर कोळके (वय २७, रा. रायकर मळा, धायरी), सुरज दिलीप जाधव (वय २८, रा. तांबोळी मशिदजवळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

त्यांच्याकडून लोखंडी कोयता, चाकू, मिरची पुड, नायलॉनची दोरी, मोबाईल व मोपेड व इतर साधने असा ७८ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या सर्वांवर यापूर्वी जबरी चोरी, शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत.

याप्रकरणी पोलीस अंमलदार ऋषिकेश व्यवहारे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेचे पथक मंगळवारी रात्री गस्त घालत होते. यावेळी पिंपरी सांडस गावाजवळील विनायक डेव्हलपर्स या बांधकाम प्रकल्पाच्या जवळ काही जण जमले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यांना घेरुन पकडले. त्यांच्याकडील घातक शस्त्रे जप्त केली. अधिक चौकशी केली असता रस्त्यावरुन जाणार्‍या येणार्‍या वाहनचालकांना अडवून त्यांना लुटण्याचा त्यांनी कट रचला होता. त्यासाठी ते तेथे जमले असल्याचे आरोपींनी सांगितले. पोलीस निरीक्षक गणेश माने अधिक तपास करीत आहेत.

Web Title: 5 criminals arrested in preparation for robbery; Attempts were made to rob motorists near Lonikanda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.