क्रीडा विभागाकडून इंदापूर तालुक्यासाठी ५ कोटी ७५ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:13 AM2021-02-13T04:13:01+5:302021-02-13T04:13:01+5:30
भरणे म्हणाले, की पुणे जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२१ नावीण्यपूर्ण योजने अंतर्गत, वालचंदनगर विद्यालय ८ लाख ...
भरणे म्हणाले, की पुणे जिल्हा वार्षिक योजना सन २०२०-२१ नावीण्यपूर्ण योजने अंतर्गत, वालचंदनगर विद्यालय ८ लाख कबड्डी मॅट, ज्युनिअर कॉलेज कळंब व केतकेश्वर विद्यालय ८.९० लाख कुस्ती मॅट, ग्रामपंचायत अंथुर्णे ८ लाख कबड्डी मॅट, ग्रामपंचायत भरणेवाडी ८ लाख कबड्डी मॅट असे एकूण ४ संस्थांना व शाळांना कुस्ती व कबड्डी मॅटकरिता एकूण ३२ लाख ९० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. २२ संस्थांना व ग्रामपंचायतींना प्रत्येकी ७ लाख रुपये याप्रमाणे १ कोटी ५४ लाख रुपये ओपन जिम साहित्याकरिता मंजूर करण्यात आले.
अशा प्रकारे व्यायामशाळा साहित्याकरिता २१ लाख, ओपन जिम साहित्याकरिता १ कोटी ५४ लाख रुपये मिळून एकूण १ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
१८ शाळांना व संस्थांना प्रत्येकी ३ लाख रुपये प्रमाणे क्रीडा साहित्य खरेदीकरिता एकूण ५४ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. अशीही माहिती राज्यमंत्री भरणे यांनी दिली. ७ गामपंचायत तसेच संस्थांना ओपन जिम साहित्य करीता प्रत्येकी ५ लाख रुपये प्रमाणे ३५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. असे एकूण ९ ग्रामपंचायत व संस्थांना प्रत्येकी ५ लाख रुपयेप्रमाणे व्यायामशाळा साहित्य व ओपन जीम साहित्यकरिता एकूण ४५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. २९ जिल्हा परिषद शाळांना क्रीडा साहित्यकरिता प्रत्येकी २. ५० लाख रुपये प्रमाणे एकूण ७२. ५० लाख रुपये, तसेच तालुका क्रीडा संकुल समिती इंदापूर, एन. ई हायस्कूल निमसाखर, न्यू भैरवनाथ विद्यालय, काझड, चैतन्य विद्यालय अशा एकूण ४ शाळांना क्रीडा साहित्यकरिता ३ लाख रुपयेप्रमाणे एकूण १२ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
अशा प्रकारे एकूण ३३ संस्थांना क्रीडा साहित्याकरिता ८४ लाख ५० हजार रुपये, तर इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे येथे क्रीडा संकुल बांधण्याकरिता १ कोटी ८१ लाख ५८,००० रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याचीही माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. _____________________________________