जुगार खेळणाऱ्या ५ जणांना रंगेहाथ पकडले; ४७ हजारांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 03:57 PM2021-10-05T15:57:43+5:302021-10-05T15:57:57+5:30
खरपुडी खुर्द गावचे हद्दीत खिंडीजवळील असणारे डोंगरावरील गुलाब भागूजी गाडे यांचे पोल्ट्री मधील शेडमध्ये काही लोक जुगार असल्याचे गोपनीय खबऱ्यामार्फत कळाले
राजगुरुनगर: खरपुडी खुर्द खंडोबा (ता खेड ) येथे पोलिसांनी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या ५ जणांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून ४७ हजार रुपायांचा मुद्देमाल जप्त केला असुन खेडपोलिसांनी जुगाऱ्यांना अटक केली आहे.
खेड पोलीस ठाण्याचे पोलीस पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस हवालदार संतोष घोलप यांना गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, खरपुडी खुर्द गावचे हद्दीत खिंडीजवळील असणारे डोंगरावरील गुलाब भागूजी गाडे यांचे पोल्ट्री मधील शेडमध्ये काही लोक जुगार पैशावर खेळत आहे. त्याचवेळी पोलीस पथकाने छापा टाकला. यामध्ये नामदेव दाजी गाडे (वय५३ ), सत्यवान काळूराम गाडे (वय ४५ ) शरद तुकाराम गाडे (वय ४३ ) रूपेश पाराजी खंडागळे (वय ३० ), अजित शंकर गाडे (वय ४५ ) हे सर्व रा.खरपुडी खुर्द ता.खेड यांना जुगार खेळताना रंगेहाथ पकडले.
त्यांच्याकडून जुगाराचे साहीत्य, रोख रक्कम व इतर चीजवस्तू असा एकुण ४७ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खेड पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. याबाबत पोलीस हवालदार निखिल गिरिगोसावी यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार शेखर भोईर करित आहे.