वळणवाडी शाळेसाठी ५ गुंठे जागा विनामोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:09 AM2021-04-04T04:09:57+5:302021-04-04T04:09:57+5:30

वळणवाडी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. नामदेव उमाजी अडसरे यांनी १९६२ साली वळणवाडी व परिसरातील सर्वसामान्य मुलांना शिक्षण मिळावे ...

5 guntas for Valanwadi school free of cost | वळणवाडी शाळेसाठी ५ गुंठे जागा विनामोबदला

वळणवाडी शाळेसाठी ५ गुंठे जागा विनामोबदला

Next

वळणवाडी येथील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. नामदेव उमाजी अडसरे यांनी १९६२ साली वळणवाडी व परिसरातील सर्वसामान्य मुलांना शिक्षण मिळावे यासाठी दोन खोल्यांसाठी स्वतःची जागा शाळेसाठी साठी दिली होती. कालातंराने परिसरातील विधार्थ्यांची संख्या वाढत असल्याने जागा कमी पडू लागली. आज शाळेत १ ली ते ४ थीचे ३० विद्यार्थी व अंगणवाडीत २५ मुले अशी ५५ मुले शिक्षण घेत आहे . या मुलांना बसण्यासाठी जागा कमी पडते व खेळण्यासाठी मैदान नसल्याने कै नामदेव अडसरे यांच्या पत्नी श्रीमती सिंधुबाई अडसरे, सौ.नंदा युवराज देवकर, उत्तम अडसरे, सत्यवान अडसरे, जयसिंग अडसरे, भगवान अडसरे, उल्हास अडसरे आदी कुटुंबीयांनी कै. नामदेव अडसरे यांचा सामाजिक कार्याचा वारसा जपत त्यांच्या स्मरणार्थ जि. प. शाळेसाठी सुमारे २५ लाख किमतीची ५ गुंठे जागा विनामोबदला देण्याचा निर्णय घेऊन दि. ३१ मार्चला रजिस्टर खरेदी खत करून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांच्या नावे बक्षीसपत्र करून दिले. त्याबद्दल दातृत्वाबद्दल ग्रामपंचायत वारूळवाडी यांच्या वतीने अडसरे कुटुंबीयांचा सत्कार केला . यावेळी सरपंच राजेंद्र मेहेर, सदस्य जंगल कोल्हे, उद्योजक संजय वारुळे, विपुल फुलसुंदर , ईश्वर अडसरे, विक्रांत अडसरे , ग्रामविकास अधिकारी सतीश गवारी आदी ग्रामस्थ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वळणवाडीचे शिक्षक मनोहर वायकर यांनी केले. जंगल कोल्हे यांनी आभार मानले.

वळणवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी अडसरे कुटुंबीयांनी ५ गुंठे जागा विनामोबदला दिल्याबद्दल अडसरे कुटुंबीयांचा सन्मान ग्रामपंचायत वारूळवाडीच्या वतीने करण्यात आला .

Web Title: 5 guntas for Valanwadi school free of cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.