‘हल्दीराम’ची फ्रेन्चाईजी देण्याच्या आमिषाने ५ लाख ८७ हजारांची फसवणूक
By नितीश गोवंडे | Published: November 1, 2023 02:54 PM2023-11-01T14:54:24+5:302023-11-01T14:54:49+5:30
ईमेल आयडी धारक आणि बँके खातेधारकाविरोधात फसवणुकीसह आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल
पुणे : हल्दीराम कंपनीची फ्रेन्चाईजी देण्याच्या आमिषाने एकाची ८ लाख ८७ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार खराडी येथे २८ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर दरम्यान तक्रारदार यांच्या राहत्या घरी ऑनलाइन पद्धतीने घडला. मयंक अरविंद कुमारसिंग (२९, रा. झेन्सार टेक्नॉलॉजी जवळ, खराडी) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ९०३८**** या मोबाईल धारक, ईमेल आयडी धारक आणि बँके खातेधारकाविरोधात फसवणुकीसह आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी मयंक यांच्याशी फोनवरून तसेच ईमेल द्वारे संपर्क साधत त्यांना हल्दीराम कंपनीची फ्रेन्चाईजी देण्याचे आमिष दाखवले. मयंक यांनी देखील त्याच्यावर विश्वास ठेवत वेगवेगळ्या कारणाने आरोपीने सांगितलेल्या बँक खात्यावर ५ लाख ८७ हजार ५०० रुपये भरले. त्यानंतर मात्र मयंक यांना ना फ्रेन्चाईजी मिळाली ना पैसे. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर मयंक कुमारसिंग यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. चंदननगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे करत आहेत.