क्रेडाई बांधणार ५ लाख परवडणारी घरे : शांतीलाल कटारिया 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 06:54 PM2018-09-12T18:54:07+5:302018-09-12T19:02:25+5:30

परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी क्रेडाई महाराष्ट्राने पुढाकार घेतला असून, मुंबई वगळता राज्यभरात ५ लाखांहून अधिक घरांच्या निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

5 lakh affordable homes to build by credie : Shantilal Kataria | क्रेडाई बांधणार ५ लाख परवडणारी घरे : शांतीलाल कटारिया 

क्रेडाई बांधणार ५ लाख परवडणारी घरे : शांतीलाल कटारिया 

Next
ठळक मुद्देसव्वातीन लाख घरांची कामे प्रगतीपथावरप्रधानमंत्री कार्यालयात लवकरच या प्रारूप आराखड्याचे सादरीकरण करण्याचा मानस

पुणे : परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी क्रेडाई महाराष्ट्राने पुढाकार घेतला असून, मुंबई वगळता राज्यभरात ५ लाखांहून अधिक घरांच्या निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ३ लाख २४ हजार ५०० घर बांधणीचे काम प्रगतीपथावर सुरू झाले असल्याची माहिती क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी दिली.
 पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष श्रीकांत परांजपे, क्रेडाई महाराष्ट्राचे सचिव अनुज भंडारी, क्रेडाई महाराष्ट्राचे शहर शाखांचे अध्यक्ष, पदाधिकारी यांसह क्रेडाई महाराष्ट्राच्या ३९ शहरातील २००हून अधिक सदस्य यावेळी उपस्थित होते. कटारिया म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेनुसार २०२२ पर्यंत ‘सर्वांना घर’ यास हातभार लावण्यासाठी क्रेडाई महाराष्ट्राने सक्रीय पुढाकार घेतला आहे. यामध्ये कागलपासून भंडारापर्यंत सर्व जिल्ह्यांचा समावेश केला आहे. या संकल्पनेस मूर्त स्वरुप देण्यासाठी संस्थेने आराखडा केला आहे. तसेच, त्याबाबत इच्छुक विकसकांना मार्गदर्शनही केले जाणार आहे. प्रधानमंत्री कार्यालयात लवकरच या प्रारूप आराखड्याचे सादरीकरण करण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
बांधकामांच्या ठिकाणी होणारे अपघात कसे टाळता येतील, येथील सुरक्षिततेसंदर्भात सावधानता कशी बाळगावी, बांधकाम क्षेत्रातील जाणवणाऱ्या इतर अडचणींवर मात कशी करता येऊ शकते यासंदर्भात संदीप पाटील यांनी मार्गदर्शन केले. 
प्रकल्पस्थळी अपघात झाल्यास घाबरून न जाता आपण दिलेले प्रशिक्षण, संबंधित दस्तऐवज, ध्वनीचित्रण आदी तयार ठेवावे, असा सल्ला देखील पाटील यांनी या वेळी दिला. या सर्वसाधारण सभेत लीगल प्लॉटिंग, टुरिझम, क्रेडाई ब्रँडिंग, सिटी ब्रँडिंग या चार नवीन समित्यांची घोषणा करण्यात आली.     

Web Title: 5 lakh affordable homes to build by credie : Shantilal Kataria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.