ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना देणार ५ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:14 AM2021-09-17T04:14:38+5:302021-09-17T04:14:38+5:30
क्रीडा समितीच्या बैठकीत या योजनेबाबत प्रस्ताव नुकताच मंजूर करण्यात आला. त्यानुसार २०२४च्या ऑलिम्पिक व पॅरालिम्पिकमध्ये पुण्याच्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकल्यास ...
क्रीडा समितीच्या बैठकीत या योजनेबाबत प्रस्ताव नुकताच मंजूर करण्यात आला. त्यानुसार २०२४च्या ऑलिम्पिक व पॅरालिम्पिकमध्ये पुण्याच्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकल्यास ५० लाख रुपये, रौप्यपदक विजेत्याला २५ लाख आणि कांस्यपदक विजेत्याला १५ लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत, अशी माहिती खेडेकर यांनी दिली. पॅरिस ऑलिम्पिक, पॅरालिम्पिकसाठी भारतीय संघात निवड झालेल्या खेळाडूंना प्रत्येकी पाच लाख देण्यात येणार आहेत. तसेच, त्याने पदक जिंकल्यानंतर ती रक्कम वेगळी देण्यात येणार असल्याचे खेडेकर यांनी सांगितले.
पुण्यात जागतिक दर्जाचे अनेक खेळाडू आहेत. त्यांना ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी ही बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. मैदानी खेळांना अधिकाधिक सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
खेळाडूंसाठी बस सुविधा
बालेवाडी स्टेडियम येथे सराव करणाऱ्या खेळाडूंना पुण्यातील विविध भागातून बस सुविधा सुरू करण्यात येणार आहे. या बससाठी दहा रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. शिवाजीनगर ते बालेवाडी, कात्रज ते बालेवाडी, पुणे स्टेशन ते बालेवाडी, स्वारगेट ते बालेवाडी या मार्गांवर ही बस सुविधा सुरू करण्यात येणार असल्याचे खेडेकर यांनी सांगितले.