‘एटीएम’मध्ये छेडछाड करुन ५ लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:11 AM2021-03-26T04:11:25+5:302021-03-26T04:11:25+5:30

पुणे : फर्ग्युसन कॉलेज रोडवरील कॅनरा बँकेच्या एटीएम सेंटरमधील मशिनमध्ये छेडछाड करून दोघांनी ५ लाख रुपयांची रोकड लंपास केली. ...

5 lakh lamps tampered with in ATMs | ‘एटीएम’मध्ये छेडछाड करुन ५ लाख लंपास

‘एटीएम’मध्ये छेडछाड करुन ५ लाख लंपास

Next

पुणे : फर्ग्युसन कॉलेज रोडवरील कॅनरा बँकेच्या एटीएम सेंटरमधील मशिनमध्ये छेडछाड करून दोघांनी ५ लाख रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना स्नेहा सेंटर येथील कॅनरा बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये १८ मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली.

कॅनरा बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये एक चोरटा आला. त्याने बॅगेमधून काही तरी काढून एटीएम मशिनच्या पाठीमागे गेला. त्याच्या सहाय्याने एटीएम मशिनमध्ये काही तरी छेडछाड करून त्याने एकापाठोपाठ ५ वेळा ट्रान्झॅक्शन करून १ लाख रुपये काढले. त्यानंतर काही वेळानंतर त्याच एटीएम सेंटरमधून एका महिलेने २० वेळा ट्रान्झॅक्शन करून ४ लाख रुपये काढले. अशा प्रकारे दोघांनी ५ लाख रुपये काढून फसवणूक केली आहे. एटीएम सेंटरला लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही दृश्ये कैद झाली आहेत. त्यावरून शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: 5 lakh lamps tampered with in ATMs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.