कोरोनामुळे मृत्यू झालेल्या वारसांना ५० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2020 04:04 AM2020-12-02T04:04:36+5:302020-12-02T04:04:36+5:30

पुणे : करोनामध्ये कर्तव्य बजावताना संसर्ग होवून मृत्यु झालेल्या जिल्ह्यातील चार जणांच्या वारसांना प्रत्येकी पन्नास लाख रूपयांची विमा ...

5 million to heirs who died due to corona | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या वारसांना ५० लाख

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या वारसांना ५० लाख

Next

पुणे : करोनामध्ये कर्तव्य बजावताना संसर्ग होवून मृत्यु झालेल्या जिल्ह्यातील चार जणांच्या वारसांना प्रत्येकी पन्नास लाख रूपयांची विमा रक्कम देण्यास मान्यता देण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाअंतर्गत ही रक्कम देण्यात येणार आहे. लवकर वारसांच्या खात्यात मदत जमा होईल, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीपक कोहीणकर यांनी दिली.

करोना संकटकाळात ग्रामीण पातळीवरील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्त्या, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, सीएससी कंपनीचे केंद्र चालक, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत कंत्राटी पद्धतीवरील कर्मचारी, कामगार, जिल्हा परिषद कर्मचारी यांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले होते. त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेमध्ये ऑक्‍टोबरमध्ये महिनाअखेरपर्यंत १८ जणांचा कर्तव्य बजावताना करोनाने मृत्यु झाला. त्यामध्ये पंचायत विभागातील चार जणांचा समावेश आहे. त्याबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात. दरम्यान, राज्यातील १७ अधिकारी, कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने विम्याची मदत जाहीर केली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील चार जणांचा समावेश आहे.

रमेश महादेव गोळे, ग्रामपंचायत कर्मचारी, शिंदेवाडी, ता. भोर., बबन महादेव तरंगे, शिपाई कम क्‍लार्क, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत तरंगवाडी, ता. इंदापूर, प्रकाश मधुकर सोनवणे, ग्रामविकास अधिकारी, पंचायत समिती, ता. बारामती. आणि परशुराम दगडू बढे, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत वाघोली, ता. हेवली असे मृत्यू झालेल्या चौघांची नावे आहेत. या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपये इतकी विमा कवच मदत देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

कोट ))))))

जिल्ह्यातील चार मयत व्यक्तींच्या वारसांना ही मदत देण्यात येणार आहे. लवकरच ही मदत त्यांच्या वारसांना देण्यात येईल.

संदीप कोहीणकर - उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभाग. जि.प.पुणे

Web Title: 5 million to heirs who died due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.