लोणावळ्यात धबधब्यातून एकाच कुटुंबातील ५ जण गेले वाहून; दोघांचे मृतदेह सापडले, तिघांचा शोध सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2024 07:45 PM2024-06-30T19:45:42+5:302024-06-30T19:46:08+5:30

लोणावळ्याच्या मागील बाजूस असणाऱ्या धबधब्यात वर्षाविहार करताना अचानक प्रवाह वाढल्याने ते कुटुंब वाहून गेले

5 people from the same family were swept away by the waterfall in Lonavala The bodies of two were found, the search for the three is on | लोणावळ्यात धबधब्यातून एकाच कुटुंबातील ५ जण गेले वाहून; दोघांचे मृतदेह सापडले, तिघांचा शोध सुरु

लोणावळ्यात धबधब्यातून एकाच कुटुंबातील ५ जण गेले वाहून; दोघांचे मृतदेह सापडले, तिघांचा शोध सुरु

लोणावळा : लोणावळा शहरात वर्षविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील सगळ्यांना जीव  गमवावा लागला आहे. भुशी धरणाच्या मागील बाजूला असलेल्या एका धबधब्याच्या प्रवाहातून ५ जण धरणात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यापैकी २ जणांचा मृतदेह सापडला असून इतर तिघांचा शोध शिवदुर्ग रेसक्यू पथकाकडून सुरु आहे. रविवारी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 
     
लोणावळा परिसरात आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे. भुशी धरणाच्या परिसरात जोरदार पाऊस झाल्याने डोंगर भागातून मोठ्या प्रमाणात धबधबे प्रवाहित होऊन धरणात येत असल्याने दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास धरण देखील ओव्हर फ्लो झाले आहे. सकाळच्या सत्रात धरण परिसरात पर्यटनासाठी आलेले काही पर्यटक रेल्वेचे विश्रांती गृह असलेल्या भागात डोंगरातून वाहणाऱ्या धबधब्यातून वाहणाऱ्या प्रवाहात भिजण्याचा आनंद घेत होते.

दरम्यान सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे सदरचा धबधब्यातील पाणी वाढत होते, पाण्याच्या या प्रवाहामुळे ५ जण पाण्याच्या वेगाने धरणात वाहून गेले. ही माहिती समजताच लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्यासह त्यांची टीम तसेच लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू पथक, मावळ वन्य जीव रक्षक टीम व स्थानिक युवक यांनी घटनास्थळी जात शोध मोहीम सुरू केली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार हे कुटुंब वानवडी येथील सय्यदनगर भागातील आहेत.

Web Title: 5 people from the same family were swept away by the waterfall in Lonavala The bodies of two were found, the search for the three is on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.