संकेतस्थळावरून 5 तालुके गायब
By admin | Published: December 9, 2014 11:28 PM2014-12-09T23:28:08+5:302014-12-09T23:28:08+5:30
महाराष्ट्र भूमी अभिलेख संकेतस्थळावरून पुणो जिल्ह्यातील पाच तालुके गेल्या महिन्यापासून गायब झाले असून, त्यामुळे गरजूंना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची वेळ आली आह़े
Next
उरुळी कांचन : महाराष्ट्र भूमी अभिलेख संकेतस्थळावरून पुणो जिल्ह्यातील पाच तालुके गेल्या महिन्यापासून गायब झाले असून, त्यामुळे गरजूंना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची वेळ आली आह़े हवेली, पुरंदर, भोर, खेड, जुन्नर हे पाच तालुके या संकेतस्थळावर दिसून येत नाही़ या असुविधेमुळे शेतकरी, बांधकाम व्यावसायिक आदींची अडचण होत आहे.
सध्याचा जमाना इंटरनेटचा आहे. राज्य सरकारही ऑनलाईन दाखले, उतारे आदी गोष्टी देण्याचा प्रय} करीत आहे. पण, शासनदरबारी या सुविधा अद्ययावत व आधुनिक स्वरूपात पुरविण्याच्या बाबतीत अजूनही अनास्थाच दिसून
येत़े महाराष्ट्र भूमी अभिलेख ही शासनाची 7/12 ऑनलाइन काढण्यासाठी वा बघण्यासाठीचे संकेतस्थळ आहे. यामध्ये प्रथम जिल्हा, त्यानंतर तालुका, नंतर गाव आणि गट नंबर किंवा नाव टाकून 7/12 शोधता येतो. त्याची छापील प्रत काढता येत असल्याने ब:याच नागरिकांची प्राथमिक स्वरूपाची कामे मार्गी लागत असत व तलाठी कार्यालयात नाहक गर्दी होणो किंवा हेलपाटे मारणो टळत होते.
सध्या महाराष्ट्र भूमी अभिलेख संकेतस्थळावरून पुणो जिल्ह्यातील पाच तालुके गेल्या महिनाभरापासून गायब झाले आहेत. त्यामुळे नागरिकांची (ग्राहकांची) चांगलीच गैरसोय झाली आहे. गेल्या आठ दिवसांर्पयत तेरा तालुक्यांपैकी फक्त तीनच तालुके या संकेतस्थळावरून पाहता येत होते, ते म्हणजे आंबेगाव, बारामती, इंदापूर.
त्यामध्ये आता आणखी सहा तालुक्यांची भर पडून ही संख्या नऊवर गेली आहे. पण, त्यामध्ये पुणो शहर तालुक्याची जास्तीची नोंद आहे. याचा अर्थ पुणो जिल्ह्यातील तेरा तालुक्यांपैकी हवेली, पुरंदर, भोर, खेड, जुन्नर हे पाच तालुके आजही या सुविधेपासून वंचित आहेत. (वार्ताहर)
तांत्रिक अडचण
याबाबत भूमी अभिलेख कार्यालयाशी संपर्क साधला असता, संकेतस्थळ अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आल़े यापूर्वी मुळशी तालुका दिसून येत नव्हता़ अन्य चार तालुक्यांचे काम पूर्ण झाले असून, काही तांत्रिक अडचण आली असेल, तर उद्याच ती दूर करण्याचा प्रयत्न करू़ तसेच मुळशी तालुक्याचा समावेश लवकरात लवकर करण्यात येईल, असे सांगण्यात आल़े