बारामती तालुक्यातील ४८ गावांसाठी ५ नळपाणी पुरवठा योजना मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:15 AM2021-08-18T04:15:05+5:302021-08-18T04:15:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मोरगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून बारामती तालुक्यातील ४८ गावांना नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा शुद्ध पाणीपुरवठा केला ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मोरगाव : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून बारामती तालुक्यातील ४८ गावांना नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा शुद्ध पाणीपुरवठा केला जाणार आहे. तालुक्यातील वरील गावांसाठी पाच योजना होणार आहेत. याबाबतचा आराखडा तयार तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.
बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागातील बहुतांश गावे पिण्याच्या पाण्याच्या शुद्ध पेयजल योजनेपासून वंचित आहेत. जमिनीत क्षार असल्याने क्षारयुक्त पाणी प्यावे लागत आहे. यामुळे यामध्ये लोणी भापकर, देऊळगाव रसाळ, सुपा, कटफळ - जैनकवाडी, गोजुबावी - खराडेवाडी परिसरातील गावे व वाड्यावस्त्या आहेत. या गावांना आगामी काही दिवसांत पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार आहे. यामध्ये लोणी भापकर पाणी योजने अंतर्गत लोणी भापकर, सायंबाचीवाडी, मासाळवाडी, जळकेवाडी, भिलारवाडी, तरडोली, पळशी, मुढाळे या गावांचा समावेश आहे. तसेच सुपे पाणीपुरवठा योजने अंतर्गत सुपे, दंडवाडी, पानसरेवाडी, काळखैरेवाडी, चांदगुडेवाडी, खंडु खैरेवाडी, भोंडवेवाडी, कुतवळवाडी, शेरेवाडी, बाबुर्डी, कोळोली, नारोळी, वढाणे, आंबी खुर्द या गावांचा समावेश आहे .
तर देऊळगाव रसाळ पाणीपुरवठा योजनेत जळगाव क. प., जळगाव सुपे, देऊळगाव रसाळ, काऱ्हाटी, माळवाडी, कऱ्हावागज, अंजनगाव, कोळोली या गावांसाठी नव्याने पाईपलाईन होणार आहे. याशिवाय कटफळ - जैनकवाडी व गोजुबावी - खराडेवाडी योजनेत प्रत्येकी परिसरातील ९ गावांचा समावेश आहे.
वरील पाच योजनांसाठी जागोजागी पाणी साठवण टॅंक बांधला जाणार आहे. परिसरातील गावांना नळाद्वारे शुद्ध पाणीपुरवठा केला जाणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून या योजनेसाठी आराखडा तयार करण्याच्या कामाचा ठेका दिला असून तालुक्यात काम सुरू झाले आहे. तरडोली येथे या योजनेच्या जीपीएस सर्व्हेसाठी आले असताना गावचे सरपंच नवनाथ जगदाळे, उपसरपंच महेंद्र तांबे व ईतर मान्यवर उपस्थित होते. या योजनेचा आराखडा तयार करून प्रस्ताव दाखल केल्यानंतर तालुक्यातील पाच योजनांना तत्काळ मार्गी लागणार आहे.