शहरात शुक्रवारीही ५ हजार ६४७ नवे कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:10 AM2021-04-10T04:10:55+5:302021-04-10T04:10:55+5:30
पुणे : शहरात शुक्रवारी आणखी ५ हजार ६४७ कोरोनाबाधित आढळून आले असून, आज दिवसभरात २७ हजार ९८६ जणांची तपासणी ...
पुणे : शहरात शुक्रवारी आणखी ५ हजार ६४७ कोरोनाबाधित आढळून आले असून, आज दिवसभरात २७ हजार ९८६ जणांची तपासणी करण्यात आली़ तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २०़ १७ टक्के आहे़
शहरात आज दिवसभरात ५१ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ७ जण हे पुण्याबाहेरील आहे़ शहरातील कोरोनाबाधितांच्या तुलनेत मृत्यूची टक्केवारी आज १़़ ७६ टक्के इतकी आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रूग्णालयांमध्ये सध्या ४ हजार ६६२ जणांवर आॅक्सिजनसह उपचार सुरू आहेत़ तर गंभीर रुग्णांची संख्याही एक हजाराच्या पुढे गेली असून, शहरात सध्या १ हजार ३ कोरोनाबाधित गंभीर आहेत़ तसेच दिवसभरात ४ हजार ५८७ कोरोनाबाधितही कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील सक्रिय रूग्णांचा आकडा ४९ हजार ९५५ इतका झाला आहे़
शहरात आजपर्यंत १६ लाख ७१ हजार ४३७ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ३ लाख १८ हजार २९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी २ लाख ६२ हजार ४२० जण कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील एकूण मृत्यूची संख्या ५ हजार ६५४ झाली आहे़
==========================