संगनमत करून लांबविले ५ टन स्टील रॉड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:12 AM2021-09-27T04:12:48+5:302021-09-27T04:12:48+5:30
पुणे : जालना येथून मागविलेल्या ५० टन स्टील रॉडमधून सुपरवायझरने चालक-क्लीनरशी संगनमत करून त्यातील ५ टन स्टील रॉडचा अपहार ...
पुणे : जालना येथून मागविलेल्या ५० टन स्टील रॉडमधून सुपरवायझरने चालक-क्लीनरशी संगनमत करून त्यातील ५ टन स्टील रॉडचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
या प्रकरणी प्रमोद मुळे (वय ४५, रा. ससानेनगर, हडपसर) यांनी कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुपरवायझर धर्मा दोडमाने, चालक बालाजी केदार सानप आणि क्लीनर करण सानप या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुळे यांच्या ट्रायकॉन इन्फा बिल्डटेक कंपनीतर्फ जालना येथील एस. आर. जे. सप्लायर्स यांच्याकडून बाबा रोडवेजमार्फत ५० टन स्टील रॉडची मागणी नोंदविली होती. जालना येथून हा माल ट्रेलरमधून पुण्यात आणण्यात आला. त्यामधून ३ लाख ११ हजार रुपयांचा पाच टन ६७० किलो स्टील रॉड दोडमाने याने दोघांशी संगनमत करून काढून घेऊन त्याचा अपहार केला. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.