कार मधून विक्रीस चाललेला १५ लाखांचा ५० किलो गांजा जप्त; बारामती पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2023 07:04 PM2023-01-29T19:04:17+5:302023-01-29T19:04:30+5:30

बारामती तालुका पोलिसांना पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार मधून इंदापूर बारामती मार्गे सासवडला गांजा विक्री साठी जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

50 kg of ganja worth 15 lakhs seized from car; Baramati police action | कार मधून विक्रीस चाललेला १५ लाखांचा ५० किलो गांजा जप्त; बारामती पोलिसांची कारवाई

कार मधून विक्रीस चाललेला १५ लाखांचा ५० किलो गांजा जप्त; बारामती पोलिसांची कारवाई

Next

बारामती (सांगवी) : इंदापूर मार्गे सासवडला कार मधून 50 किलोचा गांजा विक्रीस घेऊन जाणाऱ्या दोघांना बारामती तालुका पोलिसांनी सापळा रचत अटक केली आहे. यामध्ये एका महिलेसह एका पुरुषाला अटक करून 10 लाख रुपये किंमतीचा 50 किलो गांजा व कार असा एकूण 15 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सचिन दिलीप रणवरे (वय 35),रा.हिवरकरमळा,सासवड ता. पुरंदर,जि.पुणे),सुनिता प्रताप चव्हाण (वय 35),रा.सणसवाडी ता.शिरुर, जि.पुणे)मुळ रा.माहुरगड ता पुसद जि.नांदेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

शनिवार (दि.28) रोजी बारामती तालुका पोलिसांना पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार मधून इंदापूर बारामती मार्गे सासवडला गांजा विक्री साठी जाणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी तात्काळ वरिष्ठांना सदर बाबत माहिती देऊन सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देऊन रुई पाटी जवळ नाकाबंदी घालण्यात आली होती. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी सापळा रचला होता. 

रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार ही रुई गावातून रुई पाटीकडे येत असताना पोलिसांनी कार थांबून तपासणी केली.दरम्यान कारच्या  डीकीत मध्ये जवळपास 10 लाख रुपये किमतीचा 50 किलो गांजा मिळून आला. गांजा विक्रीसाठी घेऊन जाणारे आरोपी सचिन दिलीप रणवरे,सुनिता प्रताप चव्हाण यांना अटक करत त्यांच्या ताब्यातील 10 लाख किमतीचा गांजा तसेच 5 लाख रुपये किमतीची  स्विफ्ट कार असा एकूण 15 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे, सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे,राहुल घुगे, सहाय्यक फौजदार साळवे, राम कानगुडे,सुरेश दडस,अतुल पाटसकर,राजेंद्र जाधव महिला पोलीस हवालदार खंडागळे,आशा शिरतोडे,पोलीस नाईक अमोल नरुटे,बापू बनकर,पोलीस कॉन्स्टेबल संतोष मखरे,दीपक दराडे,दत्ता मदने,शशिकांत दळवी यांनी केली आहे.

Web Title: 50 kg of ganja worth 15 lakhs seized from car; Baramati police action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.