शिंदेवाडीत पेट्रोलपंपाची 50 लाखांची रोकड लुटली!

By admin | Published: October 13, 2014 11:15 PM2014-10-13T23:15:48+5:302014-10-13T23:15:48+5:30

भारत पेट्रोलियमच्या कंपनी संचालित पेट्रोलपंपावर जमा झालेली दोन दिवसांची 5क् लाख 78 हजारांची रोकड बँकेत भरणा करण्यासाठी जात असताना लुटण्यात आली.

50 lakh cash of petrol pump in Shindevadi! | शिंदेवाडीत पेट्रोलपंपाची 50 लाखांची रोकड लुटली!

शिंदेवाडीत पेट्रोलपंपाची 50 लाखांची रोकड लुटली!

Next
नसरापूर : भारत पेट्रोलियमच्या कंपनी संचालित पेट्रोलपंपावर जमा झालेली दोन दिवसांची 5क् लाख 78 हजारांची रोकड बँकेत भरणा करण्यासाठी जात असताना लुटण्यात आली. 
कंपनीच्या दोन ठेकेदारांवर कोयत्याने वार करून कात्रज बोगद्याजवळील शिंदेवाडी येथील टोलनाक्याजवळील नवीन पुलाखाली ही घटना घडली. इतकी मोठी रक्कम घेऊन जात असताना कोणतीही सुरक्षा व्यवस्था घेण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितल़े 
जून महिन्यामध्ये अशीच घटना घडली होती़ त्यातील आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आह़े 
संतोष जगन्नाथ बांदल व प्रशांत बाजीराव सुके (वय 39, रा. निगडे ता. भोर) असे जखमी झालेल्या पंपाच्या ठेकदारांची नावे आहेत. 
या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक आर.ए. मांजरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी 11.3क् चे सुमारास केळवडे येथील भारत पेट्रोलियम पंपाचे ठेकेदार प्रशांत बाजीराव सुके हे केळवडे येथील पंपावर 13 लाख 48 हजार 625 रुपये घेवून एमएच 12 केवायए 2799 या मोटारीने पुणो येथील बँकेत भरणा करण्यासाठी जात होत़े याच कंपनीच्या वरवे येथील पेट्रोलपंपावर जाऊन तेथील ठेकेदार संतोष जगन्नाथ बांदल यांनीही पेट्रोल पंपावरील 36 लाख 78 हजार 639 रुपयांची रक्कम घेवून मोटारीने पुणो येथील बँकेत रोकड भरणा करण्यासाठी जात असताना कात्रज बोगद्याच्या अलीकडील नवीन पुणो-सातारा पुलाच्या खाली 3 दुचाकीवरुन आलेल्या 6 युवकांनी कात्रज बाजूकडे जाणा:या पुलाखाली पुणो बाजूकडे जाणा:या आय 2क् या मोटारीला अडविल़े  
धारधार हत्यारांनी गाडीच्या सर्व काचा फोडून कारमधील प्रशांत सुके यांच्या हातावर व संतोष बांदल यांच्या डोक्यात कोयत्याने वार केले. हल्ले खोरांनी दहशत माजवून मोटारीतील 5क् लाख 78 हजार 639 रुपये घेवून तेथून पोबारा केला. 
घटनास्थळी जिल्हा अधीक्षक मनोज लोहिया, सहायक अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी विभागीय पो. अधिकारी अशोक भरते व पोलीस निरीक्षक  शाहूराव सावळे यांनी  भेट दिली़ राजगड पोलिसांनी सर्वत्र नाकेबंदी केली आह़े पोलीस उपनिरीक्षक आर. ए. मांजरे, सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे तपास करीत आहेत. (वार्ताहर)

 

Web Title: 50 lakh cash of petrol pump in Shindevadi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.