पुणे जिल्ह्यात ५० लाख क्विंटल साखर उत्पादन; १७ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोमाने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 01:05 PM2018-01-09T13:05:31+5:302018-01-09T13:09:27+5:30

पुणे जिल्ह्यात सध्या १७ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोमाने सुरू आहे. यामध्ये ११ सहकारी व ६ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे.

50 lakh quintal of sugar production in Pune district; 17 sugar factories started the harvests season | पुणे जिल्ह्यात ५० लाख क्विंटल साखर उत्पादन; १७ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोमाने सुरू

पुणे जिल्ह्यात ५० लाख क्विंटल साखर उत्पादन; १७ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोमाने सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देऊस गाळपात बारामती अ‍ॅग्रो साखर कारखान्याने घेतली आघाडीसाखर उताऱ्यामध्ये सोमेश्वर कारखाना आघाडीवर

रेडणी : जिल्ह्यात सध्या १७ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम जोमाने सुरू आहे. यामध्ये ११ सहकारी व ६ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात ५ जानेवारीअखेर एकूण ४७ लाख ८४ हजार  ३२ मेट्रिक टन उसाचे गाळप होऊन ५० लाख १२ हजार ५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. गाळपात बारामती अ‍ॅग्रो साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे. ५ जानेवारी अखेर या कारखान्याने ४ लाख ९३ हजार ३६५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून,  ५ लाख २० हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. 
दुसऱ्या क्रमांकावर कर्मयोगी सहकारी साखर कारखाना आहे. या कारखान्याने ४,३५,९९० मे. टन उसाचे गाळप करून ४,३५,५०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. बारामती अ‍ॅग्रो साखर कारखान्याचा साखर उतारा १०.५५ टक्के असून, कर्मयोगी कारखान्याचा साखर उतारा ९.९९ टक्के इतका आहे. साखर उताऱ्यामध्ये सोमेश्वर कारखाना आघाडीवर आहे. त्यांनी ३ लाख ८३ हजार ४८० मेट्रिक टन गाळप करून ४ लाख २९ हजार २५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. साखर उतारा ११.१९ टक्के  आहे.

जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांचे गाळप (मे. टन) व साखर उत्पादन (क्विंटलमध्ये)
माळेगाव : (२,६१,००० / २,७९,२००), 
छत्रपती : (२,९३,४८७/२,७८,१००),  
भीमा- पाटस :(१,८३,५२०/ १,६२,५७५), 
विघ्नहर : (३,७९,५८०/ ४,१३,३००), 
राजगड : (७३,७४५/६७,४००), 
संत तुकाराम : (२,१८,९१०/ २,२५,२२५), 
घोडगंगा : (२,९३,०६०/ ३,११,०५०), 
भीमाशंकर : (२,९२,८३०/ ३,१६,७००), 
नीरा-भीमा : (२,६८,१९०/ २,७४,३७०),  
श्रीनाथ म्हस्कोबा : (२,२९,६७५/ २,४१,८१५), 
अनुराज शुगर्स-(२,०४,७४०/ २,१८,६००), 
दौंड शुगर : (४,१२,२२०/४,५४,४५०), 
व्यंकटेश कृपा शुगर : (२,४२,३५४/ २,५८,५८०),
पराग अ‍ॅग्रो : (१,१७,८८६/१,२५,६३५).

Web Title: 50 lakh quintal of sugar production in Pune district; 17 sugar factories started the harvests season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे