रक्तदान शिबिरात ५० जणांनी रक्तदान केले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:12 AM2021-09-24T04:12:41+5:302021-09-24T04:12:41+5:30
जिल्ह्यात कोरोनानंतर डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. सत्संग भवन लोणी काळभोर येथे ...
जिल्ह्यात कोरोनानंतर डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. सत्संग भवन लोणी काळभोर येथे संपन्न झालेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन हवेलीचे उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांनी केले. यावेळी गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, तहसीलदार तृप्ती कोलते पाटील आणि अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे उपस्थित होते.
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर महिनाभर रक्तदान करता येत नाही. त्यामुळे सध्या जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. कोरोनाच्या आपत्ती काळातील ही गरज ओळखून जिल्ह्याधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आदेश दिले होते. कोरोनामुळे विविध संघटन व सामाजिक संस्थाच्या वतीने नियमितपणे घेतली जाणारी रक्तदान शिबिरे बंद आहेत. यामुळे रक्ताचा तुटवडा जाणवू शकतो. या पार्श्वभूमीवर या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पुणे रक्तपेढी, हडपसर यांचे सहकार्य लाभले. यावेळी मंडल अधिकारी गौरी तेलंग, तलाठी दादासाहेब झंजे (लोणी काळभोर), राजू दिवटे (कोलवडी), सविता काळे (थेऊर), योगिराज कनिचे (मांजरी बुद्रुक ), आरोग्य अधिकारी डॉ. डी. जे. जाधव, रूपाली भंगाळे, पंचायत समिती सदस्य युगंधर काळभोर, अनिल टिळेकर, हेमलता बडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर, माधव काळभोर, सरपंच राजाराम काळभोर, उपसरपंच ज्योती काळभोर, बाबा काळभोर, ग्रामविकास अधिकारी एस. एम. गायकवाड, सर्व ग्रामपंचायत सदस्य, विद्युत महामंडळ सदस्य रमेश मेमाणे आदी उपस्थित होते.