सेट परीक्षेस ५० टक्के विद्यार्थी उपस्थित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:09 AM2020-12-29T04:09:50+5:302020-12-29T04:09:50+5:30
महाराष्ट्र व गोवा राज्यात एकूण २३९ केंद्रावर परीक्षा घेण्यात आली.सुमारे १५ प्रमुख शहरांमध्ये ही परीक्षा झाली. रविवारी झालेल्या परीक्षेसाठी ...
महाराष्ट्र व गोवा राज्यात एकूण २३९ केंद्रावर परीक्षा घेण्यात आली.सुमारे १५ प्रमुख शहरांमध्ये ही परीक्षा झाली. रविवारी झालेल्या परीक्षेसाठी १ लाख ११ हजार १०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ७० हजार विद्यार्थ्यांनी हॉल तिकीट डाऊनलोड केले होते. मात्र, ५० हजार विद्यार्थ्यांनीच ही परीक्षा दिली.या परीक्षेचा निकाल महिनाभरात प्रसिद्ध होईल,असे विद्यापीठाच्या सेट विभागाचे समन्वयक बी. पी. कापडणीस यांनी सांगितले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर जून २०२० मध्ये होणारी सेट परीक्षा दोनदा पुढे ढकलण्यात आली होती. अखेर ही परीक्षा रविवारी सुरळीतपणे घेण्यात आली. कोरोनाच्या काळात आरोग्य विषयक नियमांचे पालन करीत ही परीक्षा घेतली. दरवर्षी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ५५ ते ६० टक्के विद्यार्थी परीक्षा देतात. यंदा ही संख्या ५० टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.