५० हजारांची रोकड सापडली
By admin | Published: October 15, 2014 05:36 AM2014-10-15T05:36:25+5:302014-10-15T05:36:25+5:30
चिंचवडमधील बिजलीनगर येथे मोटारीत ५० हजारांची रोकड सापडली. ही कारवाई निवडणूक विभागाच्या पथकाने सोमवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास केली.
पिंपरी : चिंचवडमधील बिजलीनगर येथे मोटारीत ५० हजारांची रोकड सापडली. ही कारवाई निवडणूक विभागाच्या पथकाने सोमवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास केली. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी शुभम दिलीप वाल्हेकर (वय २४, रा. बिजलीनगर, चिंचवड) याला ताब्यात घेतले आहे.
दिलीप निंबाळकर (वय ५२, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. फौजदार पी. जे. घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणूक विभागाच्या भरारी पथकाकडून ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे. दरम्यान, निंबाळकर यांना मिळालेल्या माहितीनुसार वाल्हेकर यांच्या मोटारीची तपासणी केली. त्यात ५० हजारांची रोकड सापडली. यामुळे निवडणूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सापडलेली रक्कम व शुभमला ताब्यात घेतले. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला, असे घुगे यांनी सांगितले. तपास सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)