Corona Vaccination In Pune: शहरात ससूनसह ११ दवाखान्यात ५०० कोव्हॅक्सिन लस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 08:17 PM2021-11-02T20:17:29+5:302021-11-02T20:17:37+5:30
लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार
पुणे : ससून रुग्णालयासह महापालिकेच्या ११ दवाखान्यांमध्ये बुधवारी ३ नोव्हेंबरला प्रत्येकी ५०० कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर १८६ केंद्रांवर प्रत्येकी २५० कोव्हीशील्ड लस उपलब्ध राहणार आहे.
तर उपलब्ध लसीच्या साठ्यापैकी १८ वर्षांवरील नागरिकांना ५ टक्के लस ही ऑनलाइन बुकिंगव्दारे, तर ५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे. तर लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ४५ टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना ( ११ ऑगस्टपूर्वी लस घेतलेल्यांना) ऑनलाइन बुकिंगव्दारे तर ४५ टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे. तसेच कोव्हॅक्सिन लसीचा ६ ऑक्टोबरपूर्वी पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस मिळणार आहे. लसीकरणाच्या ऑनलाइन बुकिंगकरिता सकाळी ८ वाजता स्लॉट ओपन होणार आहे.