राहूल कुल यांच्यावर ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप; संजय राऊतांच्या पुतळ्याचे दहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2023 03:16 PM2023-03-14T15:16:43+5:302023-03-14T15:17:16+5:30

राहू बेट परिसराच्या वतीने यावेळी यवत पोलिसांना निवेदन...

500 crore corruption charges against Rahul Kul; Burning effigy of Sanjay Raut | राहूल कुल यांच्यावर ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप; संजय राऊतांच्या पुतळ्याचे दहन

राहूल कुल यांच्यावर ५०० कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप; संजय राऊतांच्या पुतळ्याचे दहन

googlenewsNext

पाटेठाण (पुणे) : आमदार तथा भीमा पाटस कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी भीमा पाटस कारखान्याबाबत भ्रष्टाचार संदर्भातील केलेल्या आरोपांच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी राहू येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात खासदार संजय राऊत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करुन जाहीर निषेध व्यक्त केला.

यावेळी सरपंच दिलीप देशमुख, सतीश टिळेकर महाराज, मारुती मगर, दौंड तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माउली ताकवणे, माजी उपाध्यक्ष शिवाजी सोनवणे, पृथ्वीराज जगताप, किसन शिंदे, कैलास गाढवे,अरुण नवले, डॉ.विलास भंडारी, हनुमंत बोरावणे, युवराज बोराटे, बाळासाहेब पिलाणे, मनिषा नवले, जयश्री जाधव, रोहिदास टिळेकर, रोहिदास कंद, सुधाकर थोरात, पांडुरंग सोनवणे यांनी आपल्या भाषणातून निषेध व्यक्त केला.

समस्त ग्रामस्थ राहू बेट परिसराच्या वतीने यावेळी यवत पोलिसांना निवेदन देण्यात आले. व्यापारी असोसिएशनच्या वतीने काही कालावधीसाठी दुकाने बंद करून निषेध व्यक्त करण्यात आला. बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी संपूर्ण तालुक्यातून दौंड तहसीलदार कचेरी येथे महानिषेध मोर्चा आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दौंड तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माउली ताकवणे दिली.

Web Title: 500 crore corruption charges against Rahul Kul; Burning effigy of Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.