‘दगडूशेठ’ला शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ५०० डाळिंबांचा नैवेद्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:12 AM2021-06-16T04:12:50+5:302021-06-16T04:12:50+5:30
ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले की, “श्रीशेष ध्यान करत असताना त्यांच्या ध्यानातूनच भगवान श्रीगणेश श्रीशेषात्मज रुपात ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला ...
ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले की, “श्रीशेष ध्यान करत असताना त्यांच्या ध्यानातूनच भगवान श्रीगणेश श्रीशेषात्मज रुपात ज्येष्ठ शुद्ध चतुर्थीला मध्यान्यसमयी प्रकट झाले. याच अवतारात पुढे गजासुरनामक राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्रीगणेशांनी ब्रह्मदेव, विष्णू, शंकर, देवी, सूर्य या पंचेश्वरांच्या शक्तीने युक्त असलेले मूषक हे वाहन त्यांना करायला सांगितले. या मूषकावर बसून श्रीगणेशांनी गजासुर वध केल्यामुळे याच श्रीशेषात्मज अवताराला श्रीमूषकग असेपण नाव प्राप्त झाले. गाणपत्य संप्रदायात भाद्रपद आणि माघ मासाप्रमाणेच ज्येष्ठ चतुर्थीचाही श्रीशेषात्मज जन्मोत्सव महत्त्वपूर्ण मानलेला आहे. त्यामुळे ही सजावट व महानैवेद्य दाखवण्यात आला.”
फोटो ओळ : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात ५०० डाळिंबांचा नैवेद्य दाखविण्यात आला. याच दिवशी श्रीगणेशाचा पाताळातील गणेशजयंती म्हणजेच शेषात्मज गणेश अवतार झाला होता. त्यामुळे गाभाऱ्यात फुलांच्या माध्यमातून शेषनागाच्या प्रतिकृतींची आरास देखील करण्यात आली.
फोटो- दगडूशेठ