उघड्यावर शौच करताना पकडल्यास ५०० रुपये दंड; आळंदी नगरपरिषदेचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 12:54 PM2018-01-04T12:54:42+5:302018-01-04T13:00:29+5:30

तीर्थक्षेत्र आळंदी-देवाची (ता. खेड) नगर परिषद हद्दीत उघड्यावर शौच करताना पकडल्यास पाचशे रुपये दंड भरावा लागणार आहे, असा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली.

500 rupees fine if caught on the open bowel movement; The decision of Alandi Nagar parishad | उघड्यावर शौच करताना पकडल्यास ५०० रुपये दंड; आळंदी नगरपरिषदेचा निर्णय

उघड्यावर शौच करताना पकडल्यास ५०० रुपये दंड; आळंदी नगरपरिषदेचा निर्णय

Next
ठळक मुद्देसार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, थुंकणे, लघुशंका करणे आदींवरही कारवाई करण्याचा निर्णयआळंदी नगर परिषदेने जाहिरातींमार्फत नागरिकांना केले सूचित

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदी-देवाची (ता. खेड) नगर परिषद हद्दीत उघड्यावर शौच करताना पकडल्यास पाचशे रुपये दंड भरावा लागणार आहे. राज्य सरकारने नुकत्याच तयार केलेल्या नव्या नियमावलीत याबाबतचा कायदा करून संबंधित नगर परिषद व पालिकांना याबाबत सूचना करून संबंधित नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, थुंकणे, लघुशंका करणे आदींवरही दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी दिली.
राज्य सरकारच्या शहर विकास विभागाने प्रसिद्ध केलेल्या आदेशानुसार, सरकारने कचरा व्यवस्थापन कायदा २०१६ची महापालिका आणि नगर परिषद परिक्षेत्रात तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. यात राज्यातील अ, ब, क आणि ड श्रेणीतील महापालिकांसाठी दंडात्मक कारावाईची रक्कम एकच ठेवण्यात आली आहे.
नव्या निर्णयानुसार, कोणतीही व्यक्ती किंवा संस्था कचरा फेकून परिसर अस्वच्छ करीत असेल, तर दोषी व्यक्तींकडून १५० रुपये दंड वसूल केला जाईल, तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींकडूनही १०० रुपये दंड वसूल करण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांकडून १०० रुपयांपर्यंतचादंड वसूल केला जाईल. विशेष म्हणजे, उघड्यावर शौचास जाणाऱ्यांकडून सर्वाधिक ५०० रुपये दंड वसूल करण्याचे आदेशही यामार्फत देण्यात आले आहेत. आळंदी नगर परिषदेने या नियमांचे पालन करण्यासाठी जाहिरातींमार्फत नागरिकांना सूचित केले आहे. मात्र नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येणार असल्याचे भूमकर यांनी सांगितले.

Web Title: 500 rupees fine if caught on the open bowel movement; The decision of Alandi Nagar parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.