Pune Corona Update: शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ५ हजार; रविवारी ४२४ कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 08:21 PM2022-02-13T20:21:32+5:302022-02-13T20:21:39+5:30
सक्रिय रुग्णांपैैकी १०.९० टक्के रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत
पुणे : रविवारी १३ फेब्रुवारी रोजी शहरात ५ हजार ११६ कोरोना चाचण्या झाल्या. त्यापैैकी ४२४ कोरोनाबाधितांचे निदान झाले. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या केवळ ५ हजार ५७६ एवढी आहे.
सक्रिय रुग्णांपैैकी १०.९० टक्के रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यापैैकी ४९ रुग्ण व्हेंटिलेटरवर, तर २०० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. शहरात रविवारी ३ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैैकी १ रुग्ण पुण्याबाहेरील आहे.
सध्या शहरात ४८६ व्हेंटिलेटर बेड, तर ३९२८ ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत. शहरात आजवर ४४ लाख ३४ हजार ५३७ चाचण्या झाल्या. त्यापैैकी ६ लाख ५६ हजार ९५५ कोरोनाबाधितांचे निदान झाले. ६ लाख ४२ हजार ४८ जण कोरोनामुक्त झाले, तर ९ हजार ३३१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.