कुत्रा विकत घेण्याच्या बहाण्याने ५० हजारांची खंडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:16 AM2021-03-04T04:16:25+5:302021-03-04T04:16:25+5:30

पुणे : दीड लाखाचे कर्ज फेडण्यासाठी मित्राला कुत्रा विकत घेण्याचा बहाणा करून तिघांनी तळजाई टेकडीवर नेले. तेथे कोयत्याचा धाक ...

50,000 ransom under the pretext of buying a dog | कुत्रा विकत घेण्याच्या बहाण्याने ५० हजारांची खंडणी

कुत्रा विकत घेण्याच्या बहाण्याने ५० हजारांची खंडणी

Next

पुणे : दीड लाखाचे कर्ज फेडण्यासाठी मित्राला कुत्रा विकत घेण्याचा बहाणा करून तिघांनी तळजाई टेकडीवर नेले. तेथे कोयत्याचा धाक दाखवून ५० हजारांची मागणी केली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे.

गौरव काळे (रा. प्रेमनगर, मार्केट यार्ड), सागर गवळी (रा. बिबवेवाडी ओटा स्कीम), रोहन कांबळे (रा. ओटा बिबवेवाडी) अशी तिघांची नावे आहेत. याप्रकरणी केंजळेनगर येथील २१ वर्षांच्या तरुणाने फिर्याद दिली आहे.

फिर्यादी व तिन्ही आरोपी एकमेकांच्या परिचयाचे आहेत. सागर गवळीवर दीड लाखांचे कर्ज आहे. कर्ज फेडण्यासाठी त्याला ५० हजारांची गरज होती. त्यातूनच त्यांनी फिर्यादी तरुणाला कुत्र्याचे पिल्लू खरेदी करण्याच्या बहाण्याने तळजाई टेकडीवर नेले. त्यानंतर गवळीने कोयत्याचा धाक दाखवून या तरुणाकडे ५० हजारांची मागणी केली. तरुणाने पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी आरोपींनी खोट्या केसमध्ये अडकविण्याची देखील धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर तरुणाला तेथून सोडून देण्यात आले. घरी आल्यानंतर त्याच्यासोबत झालेल्या प्रकार त्याने घरच्यांच्या कानावर घातला. त्यानुसार त्याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली.

Web Title: 50,000 ransom under the pretext of buying a dog

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.