काळेवाडी-ज्योतिबानगर येथे दिवसात ५१ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:15 AM2021-09-04T04:15:44+5:302021-09-04T04:15:44+5:30
जिल्हा परिषद प्रथिमिक शाळेत रॅपिड अँटिजन टेस्टचे शिबिर घेण्यात आले. त्यावेळी टेस्ट केल्यापैकी ५१ जण पाॅझिटिव्ह सापडले असल्याने प्रशासनच्या ...
जिल्हा परिषद प्रथिमिक शाळेत रॅपिड अँटिजन टेस्टचे शिबिर घेण्यात आले. त्यावेळी टेस्ट केल्यापैकी ५१ जण पाॅझिटिव्ह सापडले असल्याने प्रशासनच्या वतीने काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची व्यवस्था स्वामी चिंचोली येथील कोविड सेंटरमध्ये केली असल्याची माहिती सांगळे यांनी दिली. शिवाय पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांनीही कोरोना टेस्ट करून घेण्याचे अवाहन देऊळगाव राजे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. कोरोना गेलेला नसून नागरिकांनी बेफिकीरीने न जगता प्रत्येकांनी नियम पाळणे आवश्यक आहे. यामध्ये मास्कचा वापर करणे, वारंवार सँनिटायझर करणे ,हात साबणाणे स्वच्छ धुणे ,गर्दीत जाळे टाळणे,सोशल डिस्टिंटिंगचे नियम पाळणे , ताप ,सर्दी ,खोकला अशी लक्षणे आढळल्यास त्वरीत टेस्ट करुन घ्यावी असा आदेश प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे. गावातील ग्रामस्थ, दुकानदार, व्यापारी यांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी अशी विनंती काळेवाडी हिंगणीबेर्डी ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. काळेवाडी -ज्योतिबानगर येथील वाढलेली रुग्णसंख्या पाहता तो परिसर सील करून आशा सेविका व आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी घरोघर जाऊन जनजागृती व रुग्णांची माहिती घेण्याचे आदेश जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहेत.