चंद्रकांत पाटलांच्या अंगावर शाई फेकणाऱ्याला 51 हजारांचे बक्षीस; प्रकरणाचं 'बारामती कनेक्शन'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2022 12:43 PM2022-12-11T12:43:12+5:302022-12-11T12:43:23+5:30

चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी 14 जणांवर गुन्हा

51 thousand reward for throwing ink on Chandrakant Patal's body; 'Baramati connection' of the case | चंद्रकांत पाटलांच्या अंगावर शाई फेकणाऱ्याला 51 हजारांचे बक्षीस; प्रकरणाचं 'बारामती कनेक्शन'

चंद्रकांत पाटलांच्या अंगावर शाई फेकणाऱ्याला 51 हजारांचे बक्षीस; प्रकरणाचं 'बारामती कनेक्शन'

Next

बारामती : भाजप नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकेल त्याला 51 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करणारे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड आणि इतर चौदा जणांवर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचे बारामती कनेक्शन असल्याचा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.       

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी भाजप तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे यांनी फिर्याद दिली आहे .त्यानुसार शनिवारी रात्री उशिरा तालुका पोलीस ठाण्यात ऋषी गायकवाड यांच्यासह 14 जणांवर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमेश्वर नगर परिसरात मोर्चाला संबोधित करत असताना गायकवाड यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर महाराष्ट्रात प्रथम जो शाई  फेकेल, त्याला 51 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर पुणे येथे काळी शाई फेकली गेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

शाई फेकणारा चा बारामतीत सत्कार करून त्याला 51 हजार रुपये बक्षीस देणार असेही गायकवाड यांनी जाहीर केले,असे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी भाजप कार्यकर्तेअविनाश मोटे, पांडुरंग कचरे,ज्ञानेश्वर माने, सुधाकर पांढरे, जगदीश कोळेकर, चंद्रकांत केंगार आधी कार्यकर्त्यांनी यावेळी पोलीस ठाण्यात संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिले.

Web Title: 51 thousand reward for throwing ink on Chandrakant Patal's body; 'Baramati connection' of the case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.