दुरुस्तीसाठी घोष यांनी दिले ५१ हजार रुपये

By admin | Published: April 26, 2017 04:15 AM2017-04-26T04:15:52+5:302017-04-26T04:15:52+5:30

स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीवरून झालेल्या राड्यामध्ये महापालिकेतील सभागृह नेते, भाजपा पक्ष कार्यालय व महापालिकेच्या अन्य मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

51 thousand rupees given by Ghosh for repair | दुरुस्तीसाठी घोष यांनी दिले ५१ हजार रुपये

दुरुस्तीसाठी घोष यांनी दिले ५१ हजार रुपये

Next

पुणे : स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीवरून झालेल्या राड्यामध्ये महापालिकेतील सभागृह नेते, भाजपा पक्ष कार्यालय व महापालिकेच्या अन्य मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याची जबाबदारी स्वीकारून गणेश घोष यांनी नुकसानभरपाईसाठी ५१ हजार रुपयांचा निधी महापौर मुक्ता टिळक यांच्याकडे मंगळवारी सुपूर्त केला.
स्वीकृत नगरसेवकपदासाठी अगदी शेवटच्या क्षणी उमेदवारी कापल्याने भाजपाचे शहर सरचिटणीस गणेश घोष व त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, पक्ष कार्यालय आणि महापौर कार्यालयाच्या पॅसेजमध्ये असलेल्या टेबल खुर्च्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. भाजपाच्या अंतर्गत राजकारणामुळे महापालिकेच्या मलमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तोडफोडीचा सर्व खर्च भाजपा आपल्या निधीतून करून देईल, असे महापौर मुक्ता टिळक यांनी त्या वेळी स्पष्ट केले होते. यामुळेच या तोडफोडीची नैतिक जबाबदारी स्वीकारून घोष यांनी ५१ हजार रुपयांची मदत देऊ केली आहे.

Web Title: 51 thousand rupees given by Ghosh for repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.