भोर तालुक्यातील ५२ गावांनी कोरोनाला अडविले वेशीवरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:11 AM2021-04-24T04:11:22+5:302021-04-24T04:11:22+5:30
भोर तालुक्यात १९६ गाव वाडया वस्त्या असून १५५ ग्रामपंचायती आहेत. भोर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुभाव वाढत आहे. त्यामुळे भोर ...
भोर तालुक्यात १९६ गाव वाडया वस्त्या असून १५५ ग्रामपंचायती आहेत. भोर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुभाव वाढत आहे. त्यामुळे भोर शहरातील आणि ग्रामीण भागातील कोविड सेटरमधील बेड कमी पडत आहेत. अनेक ठिकाणी आँक्सीजनची आवस्था भयानक आहे. शासनाने अनेक निंबंध लावले आहेत मात्र तरीही शहरात आणि ग्रामीण भागात दररोज ९० ते ९२ कोरोना रुग्ण आढळत आहेत. ९२ जणाचा मृत्यू झालेला आहे. यामुळे लोकांसह प्रशासनाची चिंता वाढताना दिसत आहे. शासकीय कोविड सेंटरसह खाजगी दवाखान्यातही कोविड सेटर नविन सुरु केले आहेत. मात्र रुग्ण संख्या झपाटयाने वाढत असल्याने कोविड सेटर कमी पडत असून रोज नविन सेंटर वाढवावे लागत आहेत.
भोर तालुक्यातील १९६ पैकी १४४ गावात पुणे, मुंबई किवा बाहेरुन आलेले रुग्णांना कोरोनाची लागण झालेली आहे यात एक पासून पाच पर्यत कोरोनाचा आकडा आहे. यातील अनेकजन उपचार घेऊन घरी आले आहेत. मात्र तालुक्यातील भाटघर धरण भागातील भुतोडेखोरे निरादेवघर धरण खोऱ्यातील हिर्डोशी खोरे आंबवडे भागातील काही गावे या दुर्गम डोंगरी भागातील ५२ गावात अद्याप कोरोनाचा शिरकाव झालेला नाही.
सध्या बाहेरगावी असलेल्या लोकांमुळे गावे रिकामी आहेत. मात्र भविष्यात बाहेर असलेले नागरिक गावात परत येण्यास सुरवात झालेली आहे. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव नसलेल्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो यासाठी प्रशासनाने आणी ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची खरी गरज आहे.
--
कोट
कामानिमित्त बाहेरगावी असलेले नागरीकांना गावात पुन्हा यायचे झाल्यास त्यांना प्रशासन व ग्रामपंचायतकडुन गावा बाहेरच होमक्वारंटाइन केले जाणार आहे. यामुळे गावात नव्याने कोरोनाचा शिरकाव होणार नाही.
-विशाल तनपुरे,
गटविकास अधिकारी पंचायत समिती भोर
--
चौकट -
दुर्गम डोंगरी गावे शहराचा संर्पक कमी त्यामुळे कोरोनाचा शिरकाव नाही
भोर तालुक्यातील भाटघर व निरादेवघर धरण भागातील बोपे कुंबळे खुलशी डेरे भांड्रावली तर निरादेवघर धरणा भागातील गुढे, निवगण, दुर्गाडी, कुड, अशिपी, शिळीब, हिर्डोशी भागातील लोकांचा आंबवडे भागातील काही गावे भोर शहरासी फारसा संर्पक नाही. कामानिमित्त बाहेर असलेले नागरिक क्वचीतच गावात येतात. यामूळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही येथे कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. मात्र भविष्यात बाहेरचे नागरिक गावात यायला सुरवात झाल्यास आणी रिकामे गावे पुन्हा भरायला लागल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो.