Pune | ५२ वर्षाच्या महिलेच्या अवयवदानाने तिघांना जीवनदान; यकृतासह दोन किडन्या केल्या दान

By ज्ञानेश्वर भोंडे | Published: April 15, 2023 11:47 AM2023-04-15T11:47:00+5:302023-04-15T11:49:04+5:30

हे तीनही अवयव गरज असलेल्या रुग्णांवर प्रत्यारोपित करण्यात आल्याने त्यामुळे तीन जणांचे जीव वाचले ...

52-year-old woman's organ donation gives life to three; Donated two kidneys along with liver | Pune | ५२ वर्षाच्या महिलेच्या अवयवदानाने तिघांना जीवनदान; यकृतासह दोन किडन्या केल्या दान

Pune | ५२ वर्षाच्या महिलेच्या अवयवदानाने तिघांना जीवनदान; यकृतासह दोन किडन्या केल्या दान

googlenewsNext

पुणे : रस्ता अपघातात जखमी झालेल्या ५२ वर्षीय महिलेला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ती ब्रेन डेड झाल्यावर नातेवाईकांनी अवयादनासाठी परवानगी दिली. त्यावेळी तिचे यकृत आणि दोन्ही किडनी दान करण्यात आले. हे तीनही अवयव गरज असलेल्या रुग्णांवर प्रत्यारोपित करण्यात आल्याने त्यामुळे तीन जणांचे जीव वाचले आहेत.

सिंहगड रास्ता परिसरात राहणाऱ्या ५२ वर्षीय महिलेचा रस्ता अपघात झाला होता. ती खानावळ चालवून कुटुंब चालवत होती. तिला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान तिला ब्रेन डेड घोषित करण्यात आले. यानंतर तिच्या पतीने तिचे अवयवदान करण्यास तयारी दर्शवली. यानंतर तिची एक किडनी पुण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल, दुसरी किडनी आणि यकृत सह्याद्री हॉस्पिटलला देण्यात आले, अशी माहिती पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या (झेडटीसीसी) समन्वयक आरती गोखले यांनी दिली. हे अवयवदान १२ एप्रिल रोजी पार पडले. पुणे झेडटीसीसीचे हे यावर्षीचे १३ वे अवयवदान होते. तसेच यावर्षी हे ३२ वे ट्रान्सप्लांट झाले आहे.

Web Title: 52-year-old woman's organ donation gives life to three; Donated two kidneys along with liver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.