शनिवारी पुण्यासाठी ५२३४ रेमडेसिविर इंजेक्शन्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:11 AM2021-04-25T04:11:32+5:302021-04-25T04:11:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी शनिवार (दि.24) रोजी रेमडेसिविर इंजेक्शन्सच्या 5234 व्हायल्सचा पुरवठा झाला. जिल्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी शनिवार (दि.24) रोजी रेमडेसिविर इंजेक्शन्सच्या 5234 व्हायल्सचा पुरवठा झाला. जिल्हा प्रशासनाने प्रत्येक हाॅस्पिटलचा कोटा निश्चित करून सायंकाळपर्यंत सर्व वितरकामार्फत हाॅस्पिटल्सना वाटप देखील करण्यात आला. केंद्र शासनाने राज्याला मोठ्याप्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शन्स उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले असून, सोमवारपर्यंत जिल्ह्यातील रेमडेसिविर इंजेक्शन्सचा तुटवडा कमी होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी व्यक्त केला.
पुणे जिल्ह्यातील एकूण 573 कोविड हॉस्पिटल्समध्ये असलेल्या 14007 फंक्शनल बेडसच्या प्रमाणात 5234 इंजेक्शनसचा पुरवठा हॉस्पिटल्सला स्टॉकिस्ट मार्फत करण्यात आला आहे. दररोज प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे सर्व रुग्णालयांना त्यांचे बेडच्या प्रमाणात औषध पुरवठा करण्यात येत आहे.
गेल्या आठ दिवसांपासून रेमडेसिविर इंजेक्शनचा उपलब्ध साठा दैनंदिन तत्त्वावर सर्व रुग्णालयांना समान त्तत्वावर वाटप करण्यात येत आहे. जेणेकरून सर्व कोविड हॉस्पिटलमध्ये त्यांचे रुग्णांना थेट साठा उपलब्ध होईल. पुणे जिल्ह्यातील रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा विचारात घेता जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे 11 एप्रिलपासून 24x7 रेमडेसिविर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. रेमडेसिविरचा काळाबाजार रोखणेचे अनुषंगाने शहरी भागात 6 भरारी पथके व ग्रामीण भागात 12 भरारी पथके तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली स्थापना करण्यात आली असून त्यांचे मार्फत रुग्णालये, स्टॉकिस्ट व वितरक यांच्याकडील रेमडेसिविरची उपलब्धता व सुयोग्य वापर यावर नियंत्रण ठेवणेत येत आहे. आरोग्य विभागाचे निर्देशानुसार गरजू रुग्णांना या इंजेक्शनचा वापर करावा, असे सर्व रुग्णालयांना निर्देश देण्यात आले आहेत.