Pune News | बारामती सहकारी बँकेला ५३ कोटींचा ढोबळ नफा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 08:02 PM2023-04-05T20:02:16+5:302023-04-05T20:02:30+5:30
बारामती ( पुणे ) : बारामती सहकारी बँकेने दि. ३१ मार्च २०२३ अखेर रू. ३६३२ कोटींचा एकुण व्यवसाय करून ...
बारामती (पुणे) : बारामती सहकारी बँकेने दि. ३१ मार्च २०२३ अखेर रू. ३६३२ कोटींचा एकुण व्यवसाय करून रू. ५३.१९ कोटींची तरतुदीपूर्व ढोबळ नफा मिळविलेला आहे. आजपर्यंतच्या मिळालेल्या ढोबळ नफ्यात या वर्षा अखेरचा नफा हा विक्रमी आहे. सर्व तरतुदी पुर्ण करून बँकेने रू ७.९० कोटी इतका निव्वळ नफा बँकेस झाला आहे.
बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव यांनी याबाबत माहिती दिली. त्यानुसार तसेच बँकेचे नक्त मुल्या (NET Worth) रू. १२८.०० कोटींवर पोहोचलेले आहे. बँकेने या आर्थिक वर्षात विक्रमी वसुली करून एन पी अचे प्रमाण कमी करण्यात यश मिळविले आहे.
बँकेच पुणे, सातारा, सोलापूर, नाशिक व रायगड जिल्हयात एकूण ३६ शाखा व १ विस्तारित कक्ष असा शाखा विस्तार आहे. ई-टॅक्स, ई-स्टॅम्पिंग, पॅन कार्ड, मोबाईल बँकिंग, विमा सेवा, युपीआय पेमेंट इ. सुविधा दिल्या जातात. तसेच आर.टी.जी.एस, मोबाईल बँकिंग, ए.टी.एम. ई साठी बॅकेची स्वतःची संगणकीय प्रणाली कार्यरत आहे.
बँक आपल्या खातेदारांना नेट बँकिंगची सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्नशील असून लवकरच रिझर्व बँकेकडुन नेट बँकिंगची परवानगी मिळेल अशी आ शा बँकेचे चेअरमन सातव यांनी व्यक्त केली.
बँकेंच्या प्रगतीत उपाध्यक्ष रोहित घनवट, संचालक देवेंद्र शिर्के, शिरीष कुलकर्णी, उध्दव गावडे, विजयराव गालिंदे, नामदेवराव तुपे, मंदार सिकची, डॉ. सौरभ मुथा, किशोर मेहता, जयंत किकले, रणजित धुमाळ, नुपूर शहा (वडुजकर ), डॉ. वंदना पोतेकर, कल्पना शिंदे, तसेच तज्ञ संचालक श्रीनिवास बहुळकर, प्रितम पहाडे, कार्यकारी संचालक रविंद्र बनकर यांच्यासह व्यवस्थापन मंडळातील सदस्य डॉ. अमोल गोजे, रमेश गानबोटे, शांताराम भालेराव सरव्यवस्थापक विनोद रावळ, सर्व अधिकारी वर्ग, शाखाधिकारी व सहकारी सेवक वर्ग यांचे बहुमोल मार्गदर्शन व सहकार्याने बँकेची गोडधोड सुरू असल्याचे बँकेचे अध्यक्ष सचिन सातव यांनी सांगितले.