विक्रेत्यांच्या अँटिजेन टेस्टमधून ५५ जण कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:11 AM2021-03-25T04:11:57+5:302021-03-25T04:11:57+5:30

भाजीपाला, हातगाडीविक्रेते आणि व्यावसायिक, दुकानदारांच्या तपासण्यासाठी मोहिमेला वेग दिला आहे. चाकण येथे २३४ पैकी ४२ जण कोरोनाबाधित तर ...

55 corona infected with vendor antigen test | विक्रेत्यांच्या अँटिजेन टेस्टमधून ५५ जण कोरोनाबाधित

विक्रेत्यांच्या अँटिजेन टेस्टमधून ५५ जण कोरोनाबाधित

Next

भाजीपाला, हातगाडीविक्रेते आणि व्यावसायिक, दुकानदारांच्या तपासण्यासाठी मोहिमेला वेग दिला आहे. चाकण येथे २३४ पैकी ४२ जण कोरोनाबाधित तर आळंदी येथे २६६ पैकी १३ असे एकूण ५५ कोरोनाबाधित रुग्ण एकाच दिवशी सापडल्याने नागरिकांचे धाबे दणाणले आहे. ५५ पैकी ४३ रुग्णांना म्हाडा कोविड सेंटरला तर १२ रुग्णांना खासगीत दाखल करण्यात आल्याची माहिती प्रांत विक्रांत चव्हाण यांनी दिली. या आरोग्य तपासणी मोहिमेतून सुपर स्प्रेडर ओळखले जाणारे व्यावसायिकाच्या चाचणीतून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यास प्रशासनाला यश येत असले तरी नागरिकांची बेफिकीरीपणा मात्र त्यांच्या कुटुंबीयातील ज्येष्ठ नागरिकांचे बाधित प्रमाण वाढत असून संपूर्ण कुटुंबातील सदस्य बाधित होण्याची संख्या जास्त आहे.

Web Title: 55 corona infected with vendor antigen test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.