अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील रस्ते, पुलांचे ५५ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:12 AM2021-07-28T04:12:00+5:302021-07-28T04:12:00+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : गेल्या आठवड्यात घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील रस्ते आणि लहान-मोठे पूल, मोऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ...

55 crore damage to roads and bridges in the district due to heavy rains | अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील रस्ते, पुलांचे ५५ कोटींचे नुकसान

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील रस्ते, पुलांचे ५५ कोटींचे नुकसान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : गेल्या आठवड्यात घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील रस्ते आणि लहान-मोठे पूल, मोऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात तब्बल २६० किलो मीटरचे रस्ते व १९० पुलांना पुराचा फटका बसला असून, तब्बल ५५ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी दुरुस्तीसाठी लागणार असल्याचा अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने व्यक्त केला आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यात गुरुवार व शुक्रवार दोन दिवसांत पावसाने थैमान घातले. जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा आदी तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. शेतीसह सार्वजनिक मालमत्तेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या तालुक्यात काही ठिकाणी पूल पाण्याखाली गेले तर काही ठिकाणचे रस्ते बंद झाले. नदीनाले, ओढ्यांना महापूर आल्याने रस्ते, पूल, मोऱ्या वाहून गेल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक फटका भोर तालुक्यातील रस्ते व पुलांना बसला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने प्राथमिक अहवाल तयार केला असून, यात तब्बल २६० किलोमीटरचे रस्ते व १९० पुलांचे नुकसान झाले आहे. यात तात्पुरत्या दुरुस्तीसाठी तातडीने साडे सात कोटी तर, कायमस्वरूपी दुरुस्तीसाठी ४८ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे.

-------

गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, भोर आणि वेल्हा आदी तालुक्यांमध्ये रस्ते व पुलांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये काही कामे तातडीने पूर्ण करावी लागणार आहेत. तर पाऊस थांबल्यानंतर कायमस्वरूपी दुरुस्ती करावी लागणार आहे.

- अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

---------

तालुकानिहाय रस्ते व पुलांचे नुकसान

तालुका रस्ते (कि.मी) पूल

मुळशी २९.७६ ४७

भोर ११७.८५ ३३

वेल्हा ३४.४७ १६

जुन्नर २७.३२ ३५

आंबेगाव २४ ३१

मावळ १८.३५ १६

खेड ८. २ १२

एकूण २६०.२५ १९०

Web Title: 55 crore damage to roads and bridges in the district due to heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.