पुणे जिल्ह्यातील वनविभागाच्या विकासासाठी ५५ कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:11 AM2021-03-19T04:11:36+5:302021-03-19T04:11:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यातील वनविभागाच्या विकासासाठी ५५ कोटी रुपयांचा निधी केला आहे. या निधीतून विविध प्रकारची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्ह्यातील वनविभागाच्या विकासासाठी ५५ कोटी रुपयांचा निधी केला आहे. या निधीतून विविध प्रकारची कामे करणार आहेत. यात वनांचे संवर्धन व संरक्षण यावर अधिक भर देणार असल्याचे वनराज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यशासन व सर्वसाधारण जिल्हा वार्षिक २०२०-२१ अंतर्गत वनीकरण व वन्यजीवन यावरील भांडवली खर्च या विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी निधी मंजूर केला आहे. अजित पवार यांनी या निधीसाठी पुढाकार घेतला असल्याचेही भरणे यांनी सांगितले.
भरणे म्हणाले की, वनविभागाच्या विकासासाठी मंंजूर केलेल्या निधीतून ओसाड वनजमिनीवर पुनर्रोपण करणे, संयुक्त वनव्यवस्थापन कार्यक्रम या योजनेअंतर्गत राज्यातील वनक्षेत्रात वाढ करणे व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे उद्दिष्ट आहे. वनातील मार्ग व पूल या योजनेत आवश्यकतेनुसार वनातील नवीन रस्ते तयार करणे व रस्त्याला क्रॉस होणा-या
नाल्यावर रपटे, मोऱ्या लहान पुलाची दुरुस्ती करण्यात येणार आहे. वनक्षेत्रामध्ये पर्यटन विकास कार्यक्रम अंतर्गत नवीन रोपवाटिका तयार करणे व रोपवाटिकेचे बळकटीकरण करणे व रोपवाटिकेत नवीन रस्ता करणे व अस्तित्वात असलेल्या रस्त्याचे बळकटीकरण व इतर कामे करणार आहेत.