पुण्यात USA क्रिकेट लीगचे शेअर्स मिळवून देण्याच्या आमिषाने 55 लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 10:34 AM2022-12-06T10:34:11+5:302022-12-06T10:37:30+5:30

अलंकार पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल...

55 lakh fraud with lure of getting shares of USA Cricket League pune crime news | पुण्यात USA क्रिकेट लीगचे शेअर्स मिळवून देण्याच्या आमिषाने 55 लाखांची फसवणूक

पुण्यात USA क्रिकेट लीगचे शेअर्स मिळवून देण्याच्या आमिषाने 55 लाखांची फसवणूक

Next

पुणे/किरण शिंदे : यूएसए क्रिकेट लीगचे 40% शेअर्स मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल 55 लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. अलंकार पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी 2019 पासून हा प्रकार घडत होता. 

सौरभ पांडे, वंदना कृष्णा, राशीद खान, सिराज हुसेन आणि विक्रम चौधरी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व आरोपी मुंबईचे रहिवासी आहे. याप्रकरणी आशिष पोपटराव काटे (वय 41, पुणे) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपींनी फिर्यादीला यूएसए क्रिकेट कौन्सिलकडे 20 - 20 क्रिकेट स्पर्धा चालू करण्यासाठी आणि या क्रिकेट लीगचे 40 टक्के शेअर्स मिळवून देण्याचे आमिष दाखवले. यासाठी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी 55 लाख रुपये घेतले. मात्र 40% शेअर्स मिळवून न देता आणि त्यांचे पैसे परत न देता विश्वासघात केला आहे. अलंकार पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: 55 lakh fraud with lure of getting shares of USA Cricket League pune crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.