Pune Rain| डिंभे धरणातून विसर्ग वाढला, पाण्याच्या प्रवाहात आमडे गावातील व्यक्ती गेला वाहून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 01:06 PM2022-09-16T13:06:27+5:302022-09-16T13:09:47+5:30

डिंभे ( पुणे ): आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. पाणलोट क्षेत्रातून धरणात जवळपास २५ हजार क्युसेक्सने पाण्याची ...

55 years old person from Amde came to Dimbhe Dam to increase discharge from Dimbhe Dam. | Pune Rain| डिंभे धरणातून विसर्ग वाढला, पाण्याच्या प्रवाहात आमडे गावातील व्यक्ती गेला वाहून

Pune Rain| डिंभे धरणातून विसर्ग वाढला, पाण्याच्या प्रवाहात आमडे गावातील व्यक्ती गेला वाहून

googlenewsNext

डिंभे (पुणे): आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. पाणलोट क्षेत्रातून धरणात जवळपास २५ हजार क्युसेक्सने पाण्याची आवक होत असल्याचे आज ११.३० वाजता धरणाचे पाचही दरवाजे उघडले असून सुमारे २० कुसेक्सने पाणी घोडनदी पात्रात सोडण्यात येत आहे.

आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील आमडे या गावातील चंद्रकांत काळू असवले ही व्यक्ती (वय ४८ वर्षे) डिंभे धरणात वाहून आली आहे. स्थानिक नागरिकांनी या व्यक्तीस वाचविण्यासाठी होडीतून पाठलाग केला मात्र पाण्याचा प्रचंड प्रवाह असल्याने ती हाती लागू शकली नाही. पाणलोट आडिवरे गावापर्यंत ही व्यक्ती वाहून आली असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान प्रशासनाच्यावतीने धरण पाणलोट क्षेत्रातील गावांना व घोडनदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून मासेमारी अथवा कोणत्या कामासाठी नदी पात्रात उतरु नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: 55 years old person from Amde came to Dimbhe Dam to increase discharge from Dimbhe Dam.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.