डिसेंबर अखेरपर्यंत ५५० बस येणार

By admin | Published: September 9, 2016 01:57 AM2016-09-09T01:57:12+5:302016-09-09T01:57:12+5:30

शहरातील पीएमपी प्रवाशांना पुरेशा बस उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे १५५० नवीन बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल करण्यात येणार आहेत

550 buses by the end of December | डिसेंबर अखेरपर्यंत ५५० बस येणार

डिसेंबर अखेरपर्यंत ५५० बस येणार

Next

पुणे : शहरातील पीएमपी प्रवाशांना पुरेशा बस उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे १५५० नवीन बस पीएमपीच्या ताफ्यात दाखल करण्यात येणार आहेत. त्यातील ५५० बस भाडे कराराने घेण्यात येणार असून, या बस पुढील सहा महिन्यांत पीएमपीच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. या बस भाडेकराराने पुरविण्याचे काम पीएमपीएमएलकडून देशभरातील सार्वजनिक वाहतूक संस्थाची अग्रणी संस्था असलेल्या असोसिएशन आॅफ रोड ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंगला देण्यात आहे. या संस्थेस पीएमपीकडून १६ आॅगस्ट रोजी पत्र पाठविण्यात आले असून, सहा महिन्यात या बस उपलब्ध करून देण्याची अट घालण्यात आली असल्याची माहिती पीएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
खासगी वाहनांची संख्या कमी करून जास्तीत जास्त प्रवासी वाढविण्यासाठी पीएमपीला सुमारे ३ हजार बसची आवश्यकता आहे. त्यामुळे नवीन १५५० बस घेण्यासाठी दोन्ही महापालिकांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार, ५५० बस भाडेकराराने, तर ९०० बस पीएमपी बँक लोन काढून खरेदी करणार आहे. या पीएमपीच्या खरेदीस उशीर आहे. दरम्यान, ज्या बस भाडे कराराने घेण्यात येणार आहेत. त्याचे काम एआरटीयूला देण्यात आले आहे. त्यानुसार, त्यांनीच निविदा मागवून त्याचे दर निश्चित करून पीएमपीला ते सादर करायचे आहेत.

Web Title: 550 buses by the end of December

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.