कुकडीत ५९.५३ टक्के पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 01:42 AM2018-08-13T01:42:49+5:302018-08-13T01:42:58+5:30
कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांच्या पाणलोटक्षेत्रात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणीसाठा वाढत आहे.
नारायणगाव : कुकडी प्रकल्पांतर्गत असलेल्या जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील पाच धरणांच्या पाणलोटक्षेत्रात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पाणीसाठा वाढत आहे. सर्व धरणांमध्ये एकूण १८ हजार १७९ द.ल.घ.फूट उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी १२.२४ टक्के पाणीसाठा कमी आहे. सर्व धरणांमध्ये ५९.५३ टक्के पाणी साठले आहे. सर्व धरणांपैकी डिंभा धरण ८८.४२ टक्के भरले आहे, अशी माहिती नारायणगाव येथील कुकडी पाटबंधारे विभागक्र.०१ चे कार्यकरी अभियंता के. आर. कानडे यांनी दिली.
या वर्षी जुन्नर तालुक्यात चांगल्या पावसाला सुरुवात झाल्याने माणिकडोह, पिंपळगाव जोगा आणि डिंभे या तीन धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे पाणी येण्यास सुरवात झाली आहे. सर्व धरणांत एकूण १८ हजार १७९ द.श.घ.फूट म्हणजेच ५९.५३ टक्क पाणी साठले आहे. येडगाव धरण ५८.९६ टक्के भरले आहे. या धरणाच्या पाणलोटक्षेत्रात १ जूनपासून आजअखेर ३३७ मि.मी.पाऊस झालेला आहे.
वडज धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये ५९.३५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून आजअखेर २९७ मि.मी.पाऊस झाला असून २४ तासांत २ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पिंपळगाव जोगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मृतसाठा होता, परंतु या धरणात मृतसाठा भरून उपयुक्त पाणीसाठा येण्यास सुरुवात झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये ४ द.ल.घ.फूट म्हणजेच ०.४७ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ जून पासून आजअखेर ४९२ मिमी पाऊस या धरणक्षेत्रात झालेला आहे.चोवीस तासांत २६ मिमी पाऊस झाला आहे.
माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये ४५.६३ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून, धरणाच्या पाणलोटक्षेत्रात १ जूनपासून आजअखेर ४९६ मि.मी.पाऊस झालेला आहे. २४ तासांत १९ मिमी पाऊस झाला आहे.
आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणात ११ हजार ४७ द.ल.घ.फूट म्हणजेच ८८.४२ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. धरणाच्या पाणलोटक्षेत्रात १ जूनपासून आजअखेर ७०० मिमीपाऊस झालेला आहे. २४
तासांत ९ मिमी पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती कार्यकरी अभियंता कानडे व शाखा अभिंयता ज. डी. घळगे यांनी दिली .