मुळशीत शिक्षकसाठी ५६ तर पदवीधरसाठी ४९ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:20 AM2020-12-03T04:20:07+5:302020-12-03T04:20:07+5:30
पदवीधर साठी एकूण ६२ उमेदवार रिंगणात होते यामध्ये महाविकास आघाडी व भाजपा या उमेदवाकरिता अधिक चुरस असलेली दिसून आली. ...
पदवीधर साठी एकूण ६२ उमेदवार रिंगणात होते यामध्ये महाविकास आघाडी व भाजपा या उमेदवाकरिता अधिक चुरस असलेली दिसून आली. मुळशी तालुक्यात पौड, मुठा,घोटावडे व लवळे अशा एकूण चार ठिकाणी मतदान ५ केंद्राची सोय करण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक मतदार असलेल्या लवळे येथील केंद्रावर प्रशासनाने मोठा बंदोबस्त ठेवला होता. शिक्षक साठी पौड केंद्रात सर्वाधिक ७७.६९% तर सर्वात कमी १०% मतदानाची नोंद मुठा येथील केंद्रावर झाली. पदवीधर साठी मुठा केंद्र सर्वाधिक ५५% व त्यापाठोपाठ पौड केंद्रावर ४३.३९% तर सर्वात कमी मतदान घोटावडे केद्रावर ३९.४२% झाले.
कोरोनाचा प्रादुर्भाव असूनही शिक्षक मतदारांनी उत्साहाने सहभाग घेतल्याने तालुक्यात पदवीधर पेक्षा शिक्षक मतदार संघासाठी मतदानाची टक्केवारी अधिक राहिली. यापूर्वी तालुक्याचे मतदान केंद्र हे पुणे शहराशी जोडलेले असायचे परंतु यावेळी मतदारांची वाढलेली संख्या व राजकीय पक्षांची सक्रियता यामुळे प्रशासनाने मुळशी तालुक्यात प्रथमच चार मतदान केंद्राची सोय केली होती. तसेच तहसील कार्यालयाने पंचायत समितीचे कर्मचारी यांच्या मदतीने सर्व मतदान केंद्रावर चोख व्यवस्था ठेवली होती. लवळे येथील मतदान केंद्रात अधिक मतदार असल्याने याठिकाणी पौड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप जठार यांच्यासह तहसील व पंचायत समिती विभागाचे प्रमुख अधिकारी याठिकाणी नियुक्त केले होते. पौड पोलिसांनी पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवल्याने दिवसभरातील एकूण निवडणूक पक्रिया शांततेत पार पडली.
--
फोटो : ०१ पौड पदवीधर मतदान
फोटो – लवळे ता.मुळशी येथील मतदान केंद्रावर पदवीधरसाठी मतदान करण्यासाठी मतदारांनी लावलेली रांग