चार जागांसाठी ५७ अर्ज
By admin | Published: February 26, 2015 03:14 AM2015-02-26T03:14:41+5:302015-02-26T03:14:41+5:30
महापालिकेच्या गुरूवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत आठ सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे यावर कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे.
पिंपरी : महापालिकेच्या गुरूवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत आठ सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे यावर कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे.
आठ जागापैकी राष्ट्रवादीकडून चार, शिवसेनेकडून दोन, काँग्रेसकडून दोन जणांची नियुक्ती केली जाणार आहे. राष्ट्रवादीकडे चार जागांसाठी एकूण ५७ अर्ज आले आहेत. त्यांमध्ये इच्छुकांची संख्या अधिक आहे. भोसरी विधानसभेकरिता सर्वाधिक म्हणजेच २२ अर्ज, चिंचवड विधानसभेकरिता १७ व पिंपरी विधानसभेकरिता एकूूण २८ अर्ज आले आहेत. भोसरीतून १२, चिंचवडमधून ८, पिंपरीतून ७ अशा एकूण २७ महिला सदस्य इच्छुक आहेत. सदस्यपदासाठी महिलेला संधी दिली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीतील बंडखोरी मुद्दा उपस्थित करून आमदार लक्ष्मण जगताप यांच्या राष्ट्रवादीतील समर्थकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासंदर्भात मंगळवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नगरसदस्य आणि कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. सदस्य निवडीत तीनही मतदारसंघांचा विचार करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. पवार काय निर्णय घेतात, कोणास संधी देतात, हे उद्याच्या सर्वसाधारण सभेत कळणार आहे. (प्रतिनिधी)