म्हाडामध्ये घर देण्याच्या आमिषाने महिलेला ५७ लाखांचा गंडा; जबरदस्तीने शारीरिक संभोग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 01:26 PM2022-05-27T13:26:40+5:302022-05-27T13:30:21+5:30

फ्लॅटची मूळ कागदपत्रे जबरदस्तीने लिहून घेतल्याचा प्रकार समोर...

57 lakh looted woman for giving her a house in MHADA Forced physical intercourse | म्हाडामध्ये घर देण्याच्या आमिषाने महिलेला ५७ लाखांचा गंडा; जबरदस्तीने शारीरिक संभोग

म्हाडामध्ये घर देण्याच्या आमिषाने महिलेला ५७ लाखांचा गंडा; जबरदस्तीने शारीरिक संभोग

googlenewsNext

पुणे : म्हाडामध्ये घर मिळवून देतो, असे सांगून एकाने महिलेकडून रोकड व ४० तोळे सोने असे ५७ लाख रुपये घेतले. तुझा व तुझ्या मुलाचा सांभाळ करेन, असे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संभोग केला. धानोरी, माणकगाव येथील जमिनीची व चाकण येथील फ्लॅटची मूळ कागदपत्रे जबरदस्तीने लिहून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी एका ३४ वर्षांच्या महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी संतोष पवार (रा. मेढा, ता. जावळी, जि. सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मार्च २०२० ते जानेवारी २०२० दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष पवार याने फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला़ त्यांना म्हाडामध्ये घर घेऊन देतो, असे सांगून त्यांच्याकडून ४१ लाख ६८ हजार ७०० रुपये घेतले. तसेच अंदाजे १६ लाख रुपयांचे ४० तोळे सोने असे एकूण ५७ लाख ६८ हजार ७०० रुपये घेतले. पण घर मिळवून दिले नाही. तेव्हा त्यांनी पैशांची मागणी केली. पैसे देण्यासाठी पवार याने त्यांना बोलावून घेतले. तुझा व तुझ्या मुलाचा सांभाळ करेन, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्याशी लग्न करणार आहे, असे आश्वासन देऊन त्यांच्याबरोबर जबरदस्तीने शारीरिक संभोग केला. तू जर माझेविरुद्ध तक्रार केली तर तुझे नग्न फोटो व व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी दिली.

फिर्यादी यांचे धानोरी, माणगाव येथील जमिनीचे व चाकण येथील फ्लॅटची मूळ कागदपत्रे म्हाडामध्ये फ्लॅट घेण्यासाठी लागणार आहेत, असे सांगून ती जबरदस्तीने घेऊन या जागेचे सत्यप्रतिज्ञापत्र, संमतीपत्र जबरदस्तीने लिहून घेतले, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक शेंडगे तपास करीत आहेत.

Web Title: 57 lakh looted woman for giving her a house in MHADA Forced physical intercourse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.