पुरंदर तालुक्यात आढळले ५८ कोरोनाबाधित रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:11 AM2021-05-22T04:11:41+5:302021-05-22T04:11:41+5:30
सासवड ग्रामीण रुग्णालयात ६० संशयित रुग्णांची अँटिजन चाचणी करण्यात आली. यापैकी ५ रुग्णांचे अहवाल बाधित आले. सासवड ३, पांगारे, ...
सासवड ग्रामीण रुग्णालयात ६० संशयित रुग्णांची अँटिजन चाचणी करण्यात आली. यापैकी ५ रुग्णांचे अहवाल बाधित आले. सासवड ३, पांगारे, जेजुरी १, जेजुरी येथील ग्रामीण रुगणालयात ८० संशयित रुग्णांची अँटिजन तपासणी करण्यात आली. यापैकी ३९ रुग्णांचे अहवाल बाधित आले. जेजुरी शहरांमधील ११, जवळार्जुन, तक्रारवाडी, पिंपरे प्रत्येकी १, कोथळे २, आंबळे, हिवरे, कोडीत, कोळविहिरे, निळूंज, पागांरे, पिलानवाडी, रानमळा, सासवड येथील प्रत्येकी १ तालुक्याबाहेरील अंबी ४, चोरवाडी, मुर्टी, मुरूम, वडकी प्रत्येकी १ रुग्णांचा अहवाल बाधित आला.
ग्रामीण कार्यक्षेत्रात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत’ नीरा, परिंचे, माळशिरस, बेलसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अँटिजन चाचणी घेण्यात आली. नीरा प्राथमिक आरोग्य केंद्रात १८ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी नीरा येथील ४ रुग्णांचे अहवाल बाधित आले.
परिंचे प्राथमिक आरोग्य केंद्रात २३ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी ५ रुग्णांचे अहवाल बाधित आले. माहूर २, परिंचे, तोंडल, हिवरे प्रत्येकी १ रुग्ण सापडले. माळशिरस प्राथमिक आरोग्य केंद्रात ९ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी आंबळे येथील ४ रुग्णांचे अहवाल बाधित आले. बेलसर प्राथमिक आरोग्य केंद्रात ८ संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. बेलसर येथील १ रुग्णांचा अहवाल बाधित आला.