वैद्यकीय महाविद्यालयासाठी भरणार ५९४ पदे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:19 AM2020-12-03T04:19:22+5:302020-12-03T04:19:22+5:30
नुकत्याच या महाविद्यालयासाठी कमला नेहरु रुग्णालयाला भेट देऊन गेलेल्या नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पथकाने केंद्राकडे सकारात्मक अभिप्राय पाठविला आहे. ...
नुकत्याच या महाविद्यालयासाठी कमला नेहरु रुग्णालयाला भेट देऊन गेलेल्या नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पथकाने केंद्राकडे सकारात्मक अभिप्राय पाठविला आहे. त्यानुसार, पुढील कार्यवाही केली जाणार आहे. पालिकेने वैद्यकीय महाविद्यालयासाठीचे महत्वाचे टप्पे पार केले असून येत्या शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष प्रवेश सुरु करुन महाविद्यालय सुरु करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याकरिता कमला नेहरु रुग्णालयाची इमारत वापरली जाणार असून विद्यार्थ्यांच्या निवासाकरिता सणस मैदान आणि आणखी एका ठिकाणी व्यवस्था केली जाणार आहे. मंगळवार पेठेतील सणस शाळेमध्ये महाविद्यालयाचे वर्ग भरणार आहेत.
पालिकेने याठिकाणी आवश्यक सुविधा निर्माण करण्यास आणि त्या अनुषंगाने कामे करण्यास सुरुवात केल्याचेही अगरवाल यांनी सांगितले. महाविद्यालय सुरु करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असून पालिकेकडून ही पद भरती केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात प्राध्यापकांची पदे भरली जाणार असून पुढील महिन्यात ही भरती प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.