मंचर ग्रामपंचायतीसाठी 59.71 टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:14 AM2021-01-16T04:14:59+5:302021-01-16T04:14:59+5:30

मंचर शहरातील 9545 मतदार असून एकूण 59.71 टक्के मतदान झाले आहे. उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून ...

59.71 per cent turnout for Manchar Gram Panchayat | मंचर ग्रामपंचायतीसाठी 59.71 टक्के मतदान

मंचर ग्रामपंचायतीसाठी 59.71 टक्के मतदान

Next

मंचर शहरातील 9545 मतदार असून एकूण 59.71 टक्के मतदान झाले आहे. उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले असून आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंचर ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यानंतर मंचर शहरात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, भाजप या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र भाजपने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उभे केले. तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व लोकनेते माजी खासदार स्व. किसनराव बाणखेले अण्णा गट यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली. त्याद्वारे आठ ठिकाणी महाआघाडीचे उमेदवार रिंगणात उतरले. तर काँग्रेसनेही दोन ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत. भाजपने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. आज झालेल्या मतदानात मतदारांनी सोशल डिस्टंस पाळून आपले मतदान शांततेत पार पडले. यावेळेस प्रशासनाने आलेल्या प्रत्येक मतदाराला मास्क लावणे बंधनकारक केले होते. तर प्रशासनाच्यावतीने आलेल्या प्रत्येक मतदाराचे तापमान मोजण्यात येत होते. मतदान दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंचर पोलिसांनी पोलीस उपनिरीक्षक अंजली जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोरपणाने बंदोबस्त ठेवला. नियमाचे पालन मतदार व उमेदवारांकडून करून घेण्यात येत होते. सकाळी मतदानाला कमी वेग होता दुपारनंतर तो काहीसा वाढला गेला. मंचर शहराचे एकूण 14 हजार 168 मतदार असून त्यापैकी आठ जागांसाठी 9545 मतदार आपले कर्तव्य बजावणार होते. उर्वरित 4628 मतदारांना काही जागा बिनविरोध निवडणूक झाल्यामुळे मतदान हक्क बजावता आला नाही.

Web Title: 59.71 per cent turnout for Manchar Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.